शासकीयक्रीडांगण

नाशिक महसूल विभागाच्या,क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २३ फेब्रुवारी पासून जळगावात

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करणार स्पर्धेचे उदघाटन

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती

जळगाव दि. २१: नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दि. २३ फेब्रुवारी पासून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल मध्ये होणार असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते २३ रोजी सकाळी ९ वाजता या स्पर्धांचे उदघाटन होणार आहे. तर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल देसाई, राज्याचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या वेळी खा. श्रीमती रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील, आ. एकनाथ खडसे, आ. किशोर दराडे, आ. सत्यजित तांबे, आ. चिमणराव पाटील, आ. संजय सावकारे, आ. शिरीष चौधरी, आ. सुरेश भोळे, आ. किशोर पाटील, आ. मंगेश चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

या महसूल स्पर्धा २३,२४,२५ फेब्रुवारी अशा तीन दिवस असतील.या स्पर्धेचे यजमानपद जळगाव जिल्ह्याला लाभले असून यासाठी पाच जिल्ह्यातून पाच संघ आणि एक आयुक्त कार्यालयाचा असे एकूण सहा संघ असणार आहेत. यात एकूण १४ क्रीडा प्रकार खेळले जाणार असून, त्यात सांघिक सामने ४८, वैयक्तिक सामने २०८ असे एकूण २५६ सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेत पुरुष खेळाडू ६०७ तर महिला खेळाडू १७७ असे एकूण ७८४ खेळाडू सहभागी आहेत. यात सांस्कृतिक स्पर्धाही होणार असून त्यात गायन, वादन, अभिनय, नृत्य, निवेदन, समुहगान, नाटीका आदिचा समावेश आहे. वैयक्तिक स्पर्धेमध्ये पहिले, दुसरे, तिसरे पारितोषिक असणार आहे. तर सांघिक स्पर्धेत विजेता आणि उपविजेता निवडला जाणार आहे.
या स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, पोलीस परेड ग्राउंड व एकलव्य क्रीडा संकुलात होतील.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवार दि. २५ फेब्रुवारी रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, नंदुरबारचे जिल्हाधिकारी मनिषा खत्री, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे या स्पर्धेचे निमंत्रक आहेत.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button