लोकमाध्यम न्युज | जळगांव दि.२६ जुलै २०२४ |
प.पु.आचार्य ऋषिवर किरीटभाईजी यांचे दि.३१ जुलै रोजी सुवर्णनगरी जळगाव येथे आगमन होत आहे. दि.१७ जुलै पासून देश-विदेशात वेगवेगळ्या शहरात सुरु झालेली किरीटभाईजींचे गुरुपोर्णिमा कृपायात्रा दि.३ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. जळगाव नगरीत दि.३१ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ ते १२ दरम्यान तुलसी परिवार जळगाव यांच्या कडून ऋषिवर आचार्य किरीटभाईजींची यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत गुरुपोर्णिमा कार्यक्रम श्री छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुलात आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमात गुरुपूजन करण्यात येऊन ऋषीवरजींच्या आशीर्वचनाचा लाभ मिळणार आहे. लड्डूगोपाल ची पूजा होऊन किरीट भाईजींच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ मिळणार आहे.
तेव्हा सर्व धर्मप्रेमी, गुरुबंधू- भगिनी व मान्यवरांनी वरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन तुलसी परिवारकडून करण्यात आलेआहे.