आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांना जयंतीनिमित्त जिल्हा पत्रकार संघातर्फे अभिवादन
उर्वरित आयुष्यातही पत्रकारांच्या समस्या-प्रश्न सोडवण्यासाठी कटीबध्द राहू - विजय पाटील
जळगाव दि .२०ः सामाजिक, राजकीय, शेती, सहकार क्षेत्राबरोबरच पत्रकारसृष्टीत काम करतांना निर्भेळ आनंद व समाधान मिळाले.या क्षेत्रांपैकी एक क्षेत्र निवडण्यास सांगितल्यास आपण पत्रकारिता या क्षेत्राची निवड करु व उर्वरित आयुष्यात पत्रकारांच्या समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी कटीबध्द राहू,अशी ग्वाही जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली.
येथील पत्रकार भवनात आज आद्य पत्रकार दर्पणकार कै.बाळ शास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यातआली.त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी विजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचाही भावपूर्ण सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी विश्वस्त मंडळाचे कार्यवाहक अशोक भाटिया हे होते.
सत्कारास उत्तर देताना विजय पाटील यांनी जीवन प्रवास उलगडला व प्रत्येक क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव कथन केले.पत्रकारांच्या समस्या व प्रश्न सोडवताना अनेक अडचणी आल्या मात्र त्यावर मात करुन ग्रामीण पत्रकारांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले.ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे यांनी विजय पाटील यांच्या पत्रकारसृष्टीतील अपूर्व कामगिरीचा आढावा घेतला व त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार बी.एस.चौधरी,सामाजिक कार्यकर्ते विजय महाजन,जगदीश ठाकूर यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.याप्रसंगी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष पांडुरंग महाले, शहराध्यक्ष विवेक खडसे,मनोज पाटील,श्याम देशमुख,सुभाष पाचपुते,कमलाकर पवार,विश्वास पाटील,योगेश चौधरी,सचिन गोसावी,विजयसिंग पाटील,सुरेश सानप,वाल्मिक जोशी,तेजमल जैन यांच्यासह बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.