जळगांव जिल्हाराजकिय

डॉ.केतकीताई पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त राबविला शिबिरांद्वारे शासकीय योजनांची माहिती उपक्रम

हर घर तिरंगा अंतर्गत... हजारो ध्वजाचे वाटप...!

लोकमाध्यम न्युज | जळगांव दि. ९ ऑगस्ट २०२४ |

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांचा वाढदिवस रावेर भाजपा कार्यालयात देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी हर घर तिरंगा अभियानांतर्गत रावेर भाजपा कार्यालयात तसेच विविध तालुक्यांमध्ये हजारोहून अधिक ध्वजाचे वितरण करण्यात आले.
यावेळी भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या. याशिवाय जळगाव जिल्हा तसेच मलकापूर नांदुरा येथेही शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी शिबिरं भरवण्यात आली होती तसेच ऑनलाईन अर्ज ही भरण्यात आले.

प्रत्येक देशवासीयाच्या घरावर तिरंगा फडकावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे स्वप्न दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साकार करण्यासाठी रावेर कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत ‘हर घर तिरंगा’ अभियानास सुरुवात करण्यात आली.
यावेळी रावेर तालुका भाजपाचे सरचिटणीस रवींद्र पाटील, पंचायत राज चे प्रदेश अध्यक्ष सुनील पाटील, तालुका अध्यक्ष महेशभाऊ चौधरी,ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस वासुभाऊ नरवाडे, बेटी बचाव बेटी पढाव च्या जिल्हा संयोजक सारिका चव्हाण, रावेर महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष आशा सपकाळे, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संदीप सावके, तालुका उपाध्यक्ष महेश पाटील, तालुका सरचिटणीस दुर्गेश पाटील, ओबीसी मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष साजन चौधरी, निलेश सावके, जगदीश पाटील, युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस पवन चौधरी,युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस स्वप्निल सोनवणे, तालुका सरचिटणीस लखन महाजन, शहराध्यक्ष दिलीप पाटील, शहर उपाध्यक्ष रामभाऊ शिंदे आदींची उपस्थित होती.

सावदा येथेही ध्वज वाटप
सावदा भाजपा शहराच्या वतीने डॉ केतकी ताई पाटील यांचा वाढदिवस साजरा झाला. तेथेही ध्वज वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा शाहराध्यक्ष जे के भारंबे, बेटी बचाव बेटी पढाओ च्या सारिका चव्हाण आदी उपस्थित होते.


यावल येथील खरेदी-विक्री महासंघाच्या कार्यालयात डॉ केतकी ताई पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल दादा जावळे, यावल तालुका अध्यक्ष उमेश दादा फेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.सविताताई भालेराव, शहराध्यक्ष राहुल बारी,शहराध्यक्ष महिला आघाडी नंदाताई महाजन, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष बाळूभाऊ फेगडे, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर फेगडे, माजी शहर अध्यक्ष किशोर कुलकर्णी, शहर सरचिटणीस योगेश चौधरी,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस भूषण फेगडे, तेजस पाटील (व्हाईस चेअरमन शेतकी संघ) रोहिणी उमेश फेगडे आधी भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

रावेर शिक्षण संवर्धक संघ, रावेर संचलित, सरदार जी.जी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज रावेर,
सौ.के एस ए गर्ल्स व मू.क महाविद्यालय रावेर येथे विद्यार्थिनींनी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखवले यावेळी डॉक्टर केतकीताई पाटील यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले व ध्वजाचे वितरण करून घराघरावर ध्वज लावण्यास सांगितले.


शिबिर ठरली उपयुक्त
रावेर तालुक्यातील शिंदखेडा, मुंजलवाडी, लालमाती, सहस्त्रलिंगी, भातखेडा, उटखेडा, कोचुर, रझोदा, सावखेडा. वडगाव, वाघोदा, कुसूंबा, पाल, विवरा, केऱ्हाळा, गौरखेडा, लोहार यासह यावल तालुक्यात फैजपूर, बामणोद, न्हावी, मारूळ, यावल, पाडल्सा, हिंगणा, भालोद तसेच मुक्ताईनगर, कुर्हाकाकोडा, जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक, नेरी दिगर, पहूर, बोदवड तालुक्यातील कोल्हाडी, भुसावल तालुक्यातील पिंपळगाव, साक्री, नांदुरा तालुक्यातील निमगाव, हिंगणे गव्हाळ,चोपडा शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी, मलकापूर तालुक्यातील घिर्णी या ठिकाणी शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. तसेच ऑनलाइन अर्जही भरण्यात आले. यावेळी शिबिरात येणाऱ्या नागरिकांना ध्वजाचे वाटप करण्यात आले.
फैजपूर ता.यावल येथील रामराज्य सेवाभावी संस्था यांच्याकडून डॉ केतकी ताई पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या सत्काराच्या वेळीच नवनिर्वाचित ओबीसी महिला शहर अध्यक्ष हेमांगी चौधरी यांना संघटनेत काम करण्यासाठी नियुक्तीपत्र देण्यात आले.
याप्रसंगी भाजपा शहर माजी अध्यक्ष राजाभाऊ चौधरी, युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष भूषण चौधरी, भाजपा सरचिटणीस संजय सराफ, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष भारतीताई पाटील, हरचंद वाघुळदे,व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष निलेश चौधरी, प्रशांत इंगळे, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष कुणाल कोल्हे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश कोल्हे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष अतुल महाजन आदींची उपस्थिती होती.

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button