जळगावसामाजिक

अद्वितीय गुंजन – एक संवाद

रोटरीतर्फे जळगावात गुरुवारी प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन

लोकमाध्यम न्युज | जळगाव ९ सप्टेंबर २०२४ |

वयाच्या २१ व्या वर्षी नोकरी, मानसन्मान, पैसा सोडून सामाजिक कार्यात वेगळा ठसा उमटविणाऱ्या गुंजन गोळे यांच्या समवेत अद्वितीय गुंजन एक संवाद या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिट यांच्या सहकार्याने मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे गुरुवार १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गुंजन गोळे या जळगावकरांसमवेत संवाद साधणार आहेत.
अमरावतीच्या वुमन्स फाउंडेशन व गोकुळ आश्रम ट्रस्टच्या गुंजन गोळे संस्थापिका अध्यक्ष आहेत. अनाथ, गरीब, एचआयव्हीग्रस्त, मनोरुग्ण, कुमारी माता आणि निराधार, गरजू महिलांसाठी त्या कार्य करतात. नवजात बालकांसाठी दूधदान चळवळ, बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार देखील त्यांची संस्था करते. गुंजन या मुली व महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व बचत गटातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवीत आहे.
हिरकणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुंजन गोळे यांना द रियल हिरो, सखी सन्मान, भीमरत्न, समाजभूषण, प्राऊड ऑफ महाराष्ट्रीयन, कर्मवीर, नारी सन्मान, तर्पण व जिजाऊ अवॉर्ड यासह अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे.
जळगावकरांसमवेत गुंजन गोळे प्रथमच संवाद साधणार आहेत. हा प्रेरणादायी कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन रोटरी वेस्टचे अध्यक्ष विनीत जोशी, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष
दिनेश थोरात, रोटरी एलिटचे अध्यक्ष ओमप्रकाश सिंग यांनी केले आहे.

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button