लोप पावत चाललेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन
संत ज्ञानेश्वर विद्यालयात भुलाबाईची उत्साहात स्थापना
लोकमाध्यम न्युज | जळगाव १९ सप्टेंबर २०२४ |
महाराष्ट्राची लोप पावत चाललेली संस्कृती टिकवण्यासाठी ग्रामीण भागातील लोक संस्कृती मोठया श्रद्धेने आजही सांभाळतांना दिसून येतात. परंतु शहरी भागात पुढच्या नवीन पिढीस आपल्या भारतीय संस्कृती ,भारतीय सण समजावे यासाठी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये विविध सण,उत्सव साजरे केले जातात. यानिमित्ताने भुलाबाई भुलोजींची विधिवत स्थापना करण्यात आली.
यावेळी विद्यार्थिनींच्या हस्ते आरती कण्यात आली. भुलाबाई भूलोजींची पारंपारिक गाणी व नृत्य सादर केले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी भुलाबाई विषयी सविस्तर माहिती सांगताना विविधतेने नटलेली आपली भारतभूमी. सण, उत्सव, परंपरा यातून वेगवेगळ्या पद्धतीने या संस्कृतीचे जतन संवर्धन केले जाते. महाराष्ट्र या उत्सव परंपरेत अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रातील अशीच एक उत्सवरुपी लोकपरंपरा म्हणजेच भोंडला, भुलाबाई, हादगा होय.
महाराष्ट्रातील विविध भागात स्त्रिया वेगवेगळ्या नावाने भोंडल्याची परंपरा पाळत असल्याचे दिसतं. पश्चिम महाराष्ट्रात या उत्सवाला भोंडला म्हटलं जात.खान्देशात शिवपार्वतीच्या रूपातून भुलाबाई अवतरतात. खरंतर हे स्त्री मनाचा भाबडा वेध घेत स्त्रियांना मुक्त व्हायला शिकविणारे, स्त्री भावनांचा तरंग सांगणारे उत्सव, सर्जनोत्सव होय.
शाळेमध्ये भुलाबाई-भुलोजीच्या मातीच्या मूर्ती प्रस्थापित करून गाणी गायली गेली.भुलाबाई त-कथा कला प्रकार हा मुलींना सासरी कस वागवावं याची शिकवण देते कारण सासर म्हणजे फक्त एक कुटूंब नाही तर समाज आहे आणि भुलाबाईच्या स्वरूपातील प्रत्येक मुलगी दोन कुटूंबांना एकत्र करून भावी आदर्श समाजाचे सृजन करणारा एक दुवा आहे. असे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी भुलाबाई चे महत्व विद्यार्थिनींना सांगितले.