जळगाव दि.६ : शहरातील राहिवासी असणारे अक्षय गणेश इंगळे यांनी संशोधन करत सेल्फ लॉकिंग फूटवेयर संदर्भातील लावलेल्या महत्वपूर्ण शोधाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने पेटंट जाहीर केले आहे.
अक्षय इंगळे यांनी व्ही.आय.टी. युनिर्व्हसिटीतून कॅड, कॅम आणि रोबॅटिक्समध्ये एम.टेक. केले असून, सद्यस्थितीत ठाणे येथे जी.एस.टी. विभागात राज्य कर निरीक्षक म्हणून कार्यरत असून, शहरातील सौ.छाया व गणेश लक्ष्मण इंगळे यांचे चिरंजीव आहेत.
अक्षय इंगळे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.