लोकमाध्यम न्युज | जळगाव १५ सप्टेंबर २०२४ |
गणपती अर्थवशीर्ष ही गणपतीची सर्वोच्च अशी स्तुती अथर्वणमुनीनीं रचली. या उच्च कोटीची गणपती सेवेत तीन हजार गणेश भक्तांनी पन्नस हजार पेक्षा जास्त आवर्तनांनी धारा प्रवाही गणपती अथर्वशीर्षाचे पठणातून केली.
रविवार, सकाळी ९ ते १२ या वेळेत सुभाष चौकाच्या मानाचा गणपती सन्मुख शास्त्र शुध्द व भक्तीमय पवित्र वातावरणात हा उपक्रम संपन्न झाला. तीन हजार अथर्वशिर्ष मुखोदग असलेल्या गणेशभक्तानी एका स्वारात धारा प्रवाहीत लागोपाठ २१ आवर्तने म्हणुन पन्नास हजार पेक्षा अधिक सामुहिक आवर्तने झाली. या प्रसंगी सुभाष चौक खचाखच भरले होते.
सुभाष चौक मित्र मंडळ, सुभाष चौक नागरी पतसंस्था जळगांव व श्री स्वामी समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाचे प्रतिवर्षी मोठे होत जाणारे स्वरुपास भक्तीच्या दिशेने नेणे करीता या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरवातीस कार्यक्रमाचे प्रमुख आचार्य पंडीत महेशकुमार त्रिपाठी यांनी गणपती अथर्वशीर्षाचे माहत्म कथन केले. श्री गणेश विद्येचे देवता असुन पहिली ते उच्च शिक्षणा पर्यंत विद्यार्थ्यांनी गणेशाची आराधना करावी, गणपतीचे कृपाने विद्यार्थ्यांची शैक्षणीक गुणवत्ता वाढीस लागते, सुसंस्कारीत भावी पिढी निर्माण होते असे त्यांनी म्हटले तसेच हजारोच्या मुखातुन गणपती अथर्वशीर्ष पठणाचे स्वर वातावरणात मिश्रीत होवुन निर्माण होणार्या उर्जेतून राष्ट्र समृधी, जळगांव शहरात व जिह्यात शांतता रहावी, समृध्दी, सुबत्ता, एकोपा नांदावा राष्ट्रोन्नतीत कोणतेही विघ्न येवु नये असे संकल्प गणेश भक्तांनी घेतला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार राजुमामा भोळे हे होते त्यांचे हस्ते 101 भाविकांना अभीषेकाने सिद्ध झालेले चांदीचे शिक्के दूण्यात आले.
कार्यक्रमा करिता सुभाष चौकात सावली करीता मांडव टाकण्यात आले होते. परीसर स्वच्छ करून वातावरण निर्मिती करीता परीसरात अंब्याची तोरणे, झेडुंच्या फुलाच्या माळा, भगवे ध्वज व गोमुत्र शिंपाडुन पवित्रता आणली होती. भाविकांकरीता बिछायत, प्रसाद वाटप, अष्ठगंध टिळा, महीलांसाठी हळदी-कुंकु, अथर्वशीर्ष पुस्तीका वाटप, पादत्राणा करीता दोन विशेष स्टोल लावण्यात आले होते. शंभर पेक्षा जास्त कार्याकार्त्यांद्वारे अत्यंत नियोजन पुर्वक कार्यक्रम यशस्वी करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरवातीस शंखनाद, ओंकारध्वनी, गणपती पुजन, शांती पाठ व अथर्वशीर्षचे अर्थ व माहत्म कथन होवुन सामुहीक अथर्वशीर्षचे लागोपाठ २१ आर्वतने म्हटली गेली. यावेळी गणपतीवर दुग्धभिषेक व दुर्वाभिषेक करण्यात आले. दुग्धभिषेक श्री. आदित्य खटोड व सौ. श्रेया खटोड तर दुर्वाभिषेक श्री. किशोरजी व्यास व सौ. सरोज व्यास यांच्या हस्ते करण्यात आले.
गणपती अथर्वशीर्षातून निर्माण होणार्या उर्जेद्वारे प्रसन्नतेच्या वातावरणात निश्चितच परीसराचे, सर्व गणेश भक्तांचे आणि संपुर्ण जगाचे कल्याण होवोत अशी प्रार्थना केली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. सुत्र संचालन संजय गांधी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशंस्वीते करीता श्रीकांत खटोड, मनिष अग्रवाल, प्रविण बांगर, हरिष चव्हाण, बापु कापडणे, गोपाल पाटील, महेश गोला सुभाष चौक मित्र मंडळाचे कार्यकर्ते व पतसंस्थेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.