लोकमाध्यम न्युज | जळगांव २ जानेवारी २०२५ |
१ जानेवारी २०२५ रोजी नव वर्षाच्या निमित्ताने संचार नगर वासीयांनी श्री सत्यनारायण कथा आणि सुंदर-कांड याचे सर्वांच्या सहभागातून आयोजन केले होते.
सुंदर कांड आणि संगीतमय भजन प्रस्तुती करण्यासाठी सराफ बाजारातील सस्तंग भजन मंडळ मधील सर्व सेवाभावी सदस्य उपस्थित होते. यामध्ये विश्वनाथ जोशी…सत्यनारायण तिवारी..प्रकाश जोशी…ओमप्रकाश वर्मा… सूनय जोशी, दीपक दायमा, गणेश दायमा,. अनिल टाक,. दिनेश जोशी, नीलेश तिवारी, चंद्रशेखर नरवरीया, राहुल व्यास, संतोष सोमाणी, जितेंद्र जानी, नैमेश शर्मा, कान्हा जी आदि उपस्थित होते.
संचार नगरवासियांनी अशाप्रकारे नव वर्षाचे स्वागत केले आणि आपल्या संस्कृतीला जपण्याच्या दिशेने एक पाऊल उचलले आणि इतर वस्त्यांमध्येही अशा प्रकारचे आयोजन होण्यासाठी एक उत्तम आदर्श प्रस्थापित केला.