लोकमाध्यम न्युज | जळगाव २९ सप्टेंबर २०२४ |
रुख्मिणी फांऊडेशन मिडटाऊन व भा ज पा एनजीवो सेल कडुन श्रीकृष्ण लॉन्स समोर ,शिरसोली रोड जळगाव येथील झोपडपट्टीतील गरजुंना रुख्मिणी फांऊडेशन मिडटाऊन व भाजपा एनजीवो सेल यांच्या तर्फे कपडे वाटप कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी प्रमुख अतिथी- अरविंद देशमुख संचालक – जिल्हा दूध विकास फेडरेशन जळगाव उपास्थित होते
यावेळी अरविंद देशमुख यांनी या गरजु/गरीब/कामगार लोकांची मुलां/मुलीं नी शिक्षण घ्यावे व मुख्य प्रवाहात यावे, पुढे भारताच्या विकासात योगदान दयावे तसेच लोकांनी कष्ट करुन उदयोग,व्यवसाय करावा असे सांगीतले
या प्रसंगी रेडिओ सिटी 91.1 एफएम चे प्रसाद गिरासे व आशिष उपासनी ,तसेच वासंती चौधरी ,पंकज जैन, राजु श्राॅफ, कमलेश डांबरे, डॉ विजय साखलां, राजेश भंडारी, शैलेश घाटे, शंतनु कुडे इ पदाधीकारी उपस्थित होते