जळगांव जिल्हाशासकीय
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांचा ११ ऑक्टोबर रोजी बुलढाणा,जळगाव जिल्हा दौरा
लोकमाध्यम न्युज | जळगाव १० ऑक्टोबर २०२४ |
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांचा 11 ऑक्टोबर रोजी बुलढाणा,जळगाव जिल्हा दौरा असून तो पुढील प्रमाणे.
शुक्रवार, दिनांक 11 ऑक्टोबर, 2024 सकाळी 09.00 वाजता कोथळी ता. मुक्ताईनगर-निवासस्थान येथून वाहनाने चिखली जि. बुलढाणाकडे रवाना, दुपारी 03.00 वाजता पिंपळगाव देवी येथून जामनेर जिल्हा जळगाव कडे रवाना, सायंकाळी 5.00 वाजता जामनेर जि. जळगाव “शिवसृष्टी” लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थित, सायंकाळी 07.00 वाजता जामनेर येथून भुसावळकडे प्रयाण, सायंकाळी 7.30 भुसावळ येथे आगमन, विविध नवरात्र महोत्सवाला उपस्थित, रात्री 8.30 वाजता भुसावळ जि. जळगाव-येथून कोथळी ता. मुक्ताईनगरकडे रवाना.