जळगावक्राईम

उसनवारीच्या पैशांतून रणछोड नगरातील विवाहितेची झाली हत्या

एका महिलेसह दाेन संशयित आराेपींना घेतले ताब्यात

लोकमाध्यम न्युज | जळगाव ११ ऑक्टोबर २०२४ |

जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मागील रणछोड नगर परिसरात काल रात्री लाईट गेल्याचा फायदा घेत अज्ञाताने विवाहितेच्या घरात घुसून तिची निर्घृण हत्या केली होती.ही हत्या उसनवारीच्या पैशांतून झाल्याचे समजते. याबाबत पाेलिसांनी एका महिलेसह दोघे संशयित आराेपींना ताब्यात घेतले आहे.

मयत सुवर्णा राजेश नवाल (वय ५७, रा. रणछोड नगर, गणेश वाडी जळगाव). त्यांचे पती राजेश नवाल हे दाणा बाजार परिसरामध्ये धान्याचे व्यापारी आहेत. गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या पूर्वी सुवर्णा नवाल ह्या घरी एकट्या होत्या.
अज्ञात व्यक्तीने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला होता. पती राजेश नवाल हे घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मयत सुवर्णा नवाल यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले असता त्यात एका नंबरवर दिवसात सारखे ४ ते ५ वेळा फोन  केल्याचे दिसले. त्या दृष्टीने तपासले असता पोलीस संशयित आरोपी लालबाबू उर्फ लाला रामनाथ पासवान (वय ४३, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्यापर्यंत पोहोचले. तसेच सरलाबाई धर्मेंद्र चव्हाण (वय ४२, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), राजेंद्र उर्फ आप्पा रामनाथ पाटील (वय ५८, रा. म्हसावद ता. जळगाव) यांनाही ताब्यात घेण्यात आले. तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

मयत सुवर्णा नवाल यांच्या घरी संशयित सरलाबाई कामाला होती. सुवर्णा नवाल यांनी सरलाबाई हिला उधार ३ लाख रुपये दिले होते. सरलाबाईने ते परत केले नाही. तसेच दुसरा संशयित लाला पासवान याला ५० हजार रुपये मयत सुवर्णा यांनी दिले होते. तर लाला हिच्या पत्नीला काही दागिने दिले होते. दोघे टाळाटाळ करत होते. त्यातच सरलाबाई हिच्या ओळखीचा तिसरा संशयित राजेंद्र उर्फ आप्पा याने अजून पैसे उधार मिळावे म्हणून सुवर्णा नवाल यांच्या कडे पैशांची मागणी केली होती.

दि. १० रोजी सुवर्णा यांनी दिवसभरात लाला याला फोन करून उसनवारी दिलेले पैसे परत मागितले होते. लाला पासवान, सरलाबाई आणि राजेंद्र यांनी काल गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता रणछोड नगरातील सुवर्णा नवाल यांचे घर गाठले. तेथे तिघांचे वाद झाले. लाला पासवान याने सुवर्णा यांच्या डोक्यात हातोड्याचे दोन वार करून त्यांना संपविले. तेथून तिघे पसार झाले. दरम्यान, पोलिसांनी “कॉल डिटेल्स” काढून तिघांचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील हातोडा जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी हि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) निरीक्षक बबन आव्हाड आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीएसआय दत्तात्रय पोटे, अतुल वंजारी, विजयसिंग पाटील, राजेश मेंढे, संजय हिवरकर, एमआयडीसीचे पीएसआय दीपक जगदाळे, पीएसआय शरद बागल, किशोर पाटील, गणेश ठाकरे, रामहरी गीते आदींनी केली आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button