लोकमाध्यम न्युज | जळगाव १५ ऑक्टोबर २०२४ |
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत जळगाव शहरातील पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठी 25 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली आहे.
जळगाव शहराच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पाडण्यासाठी शहरातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या मेहरूण तलाव व गिरणा पंपिंग स्टेशन परिसराचा विकास व्हावा यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत निधी मंजूर हाण्योसाठी मागणी करून त्यावर सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता.
त्यावर सकारात्मक निर्णय घेत मंत्री गिरीश महाजन व उद्योगपती अशोक जैन यांच्या सहकार्याने मेहरूण तलाव परिसराचा विकास करणे व गिरणा पंपिंग स्टेशन परिसराचा विकास करणे साठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
ही कामे झाल्यामुळे शहरातील नागरिकांना सुंदर असे पर्यटन स्थळ पाहायला मिळणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष सहकार्यामुळे मंजुरी झाल्यामुळे आमदार सुरेश भोळे यांनी त्यांचे आभार मानले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार , पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांचेही आमदार सुरेश भोळे यांनी आभार मानले आहे.