जळगावशैक्षणिकसांस्कृतिक

गणेशोत्सवाच्या काळात समाजातील एकात्मता, बंधुभाव, सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा जपण्याचे मोठे कार्य : रोजमिन खिमानी

रोजलँड प्राथमिक विद्या मंदिर व इंग्लिश मीडियम शाळेत गणेशस्थापना उत्साहात : लोकमान्य टिळकांच्या परंपरेचा जागर

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.२८ ऑगस्ट २०२५ :गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरात भक्तीमय वातावरण असताना, रोजलँड इंग्लिश मीडियम शाळेत दीड दिवसीय गणपती बाप्पाची स्थापना मोठ्या उत्साहात पार पडली. शाळेतील पालकांच्या हस्ते गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका वंदना सोले व इंग्रजी माध्यमाच्या सीता तिवारी विद्यार्थी, शिक्षकवृंद, तसेच शाळेतील सर्व कर्मचारी वर्ग उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका वंदना सोले यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.
स्थापना सोहळ्यानंतर शाळेच्या संस्थापिका अध्यक्ष रोजमीन खिमानी प्रधान यांनी पालक व उपस्थित समाजबांधवांना संबोधित केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. टिळकांनी हा उत्सव फक्त धार्मिक सोहळा न ठेवता समाजाला एकत्र आणण्यासाठी, एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी आणि स्वातंत्र्यसंग्रामाला बळ देण्यासाठी सुरू केल्याची आठवण त्यांनी करून दिली. गणेशोत्सव हा आजच्या काळात समाजातील एकात्मता, बंधुभाव, सांस्कृतिक जाणीवा आणि सामाजिक सलोखा जपण्याचे मोठे कार्य करत आहे. गणपती बाप्पा हे ‘ज्ञानाचे दैवत’ असून शाळेत गणेशस्थापना केल्याने विद्यार्थ्यांमध्ये विद्या, बुद्धी आणि संस्कारांची प्रेरणा जागृत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना शाळा समाजासाठी केवळ शिक्षणपुरतेच नव्हे, तर संस्कारांचे केंद्र ठरते, असे नमूद केले.

या गणेशस्थापनेमुळे शाळेच्या परिसरात भक्तिमय, आनंदमय आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.यावेळी शाळेच्या इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सीता तिवारी यांनी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना विसर्जन सोहळ्यास सहभागी होण्याचे आवाहन केले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button