जळगावधार्मिकसामाजिक

आमदार राजुमामा घडवताय 2 हजार भाविकांना अयोध्या काशी दर्शन ;जय श्रीरामाच्या जयघोषात अयोध्या स्पेशल रेल्वेने भाविकांचे प्रस्थान

मंत्री ना गिरीश महाजन,ना रक्षाताई खडसे यांनी दाखविला झेंडा

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.१९ ऑगस्ट २०२५ :जळगाव शहरातील नागरिकांसाठी अयोध्या – काशी यात्रेचे मोफत रेल्वे प्रवासाचे आयोजन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे ( राजू मामा ) यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. या विशेष यात्रेची सुरुवात जळगाव येथून 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी रेल्वे स्थानकावरून जय श्रीराम हर हर महादेवाचा जयघोष करत २ हजार भाविकांचे अयोध्यासाठी प्रस्थान झाले.

यावेळी रेल्वेला झेंडा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे खा. स्मिताताई वाघ आ. सुरेश भोळे जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी ग्रामीणअध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी आदींनी झेंडा दाखवून भाविकांना शुभेच्छा देत रवाना केले.
ही धार्मिक यात्रा भाविकांसाठी एक अध्यात्मिक अनुभव ठरणार असून, सर्वांच्या सहकार्याने ती यशस्वी होईल, असा विश्वास शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी केला विशेष म्हणजे स्वतः आमदार सुरेश भोळे माजी महापौर सीमाताई भोळे हे स्वतः कार्यकर्त्यां बरोबर व भाविकांबरोबर रेल्वे गाडीमध्ये उपस्थित आहेत. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button