जळगांव जिल्हाधार्मिकसामाजिक

भगवान श्री परशुराम जन्मोत्सव जय्यत तयारी पुर्णत्वाकडे; रविवारी विराट मोटारसायकल रॅली

स्वतः परशुराम दूत बना व हजारोंच्या संख्येत शोभायात्रेत सामील व्हा - ओम त्रिवेदी अध्यक्ष बहुभाषिक ब्राह्मण संघ

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) – भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचे यंदा १७ वे वर्ष असुन लागोपाठ सतराव्या वर्षी देखील विशाल आयोजनाने जन्मोत्सव साजरा होणार आहे. या विशाल ब्राह्मण एकता मेळाव्याचे यशस्वीते करीता ४०० हुन अधिक स्वयंसेवक श्रमदान करीत असुन दानशुरांच्या अर्थ दानाने आयोजन यशस्वी केले जात आहे.यंदाच्या जन्मोत्सवाची सुरूवात दिनांक ०५ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराने संपन्न झाली.  रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी वातावरण निर्मीती करीता रोजी विराट मोटर सायकल रॅली सायं. ५ वा महाबळ चौकातुन हजारोंच्या संख्येत निघणार आहे. महाबळ चौकातुन रॅली पुढे काव्यरत्नावली चौक, रिंगरोड मार्गे शाश्त्री टाॅवर, सुभाष चौक, पांडे डेअरी चौक, विर सावरकर पुतळ्यावरून पोलिस मल्टीपरपज हाॅलवर समारोप होणार आहे. सायं. ७ वा. याच ठिकाणी दानदाते व श्रमदाते गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी सांगीतले.

यावेळी विद्यमान अध्यक्ष ॲड ओम त्रिवेदी, संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, माजी अध्यक्ष आर्किटेक्ट नितीन पारगावकर, सहसचिव पंकज पवनीकर, माजी अध्यक्ष सुरेद्र मिश्रा, राजेश नाईक, शिव शर्मा, गोपाल पंडीत, व महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षा सुधाताई खटोड, नूतन अध्यक्षा पूनम तिवारी, सचिव मानसी जोशी, प्रसिद्धी प्रमुख मनीष पात्रीकर उपस्थित होते.

ब्राह्मण एकता दिवसाचा मुख्य कार्यक्रम 

रविवार, दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ९.०० वाजता परशुराम पुजन ग्राम दैवत श्री राम मंदिरात होऊन दुपारी ४.३० वाजता विराट अशी शोभायात्रा सुभाष चौकातुन निघणार आहे शोभायात्रेत सालाबादा प्रमाणे भव्य दिव्य भगवान परशुराम रथा सह वाजतगाजत ढोल ताशा लेझिम व दांडिया पथकसह सहभागी होऊन धुम धडाक्याने हजारोंच्या सहभागाने विराट अशी शोभायात्रा निघणार आहे.

शोभायात्रेत महिलांचे तलवार बाजी दांडपट्टा प्रात्यक्षिकासह ढोल पथके, लेझीम व दांडीया पथके सहभागी होणार असुन पथकांच्या सरावाला हनुमान जयंती पासुन सुरूवात झाली असुन ते यंदाचे देखील आकर्षण राहणार आहे. विराट शोभायात्रेचा समारोप शिवतिर्थावर होईल.

जन्मोत्सवात नाविन्यता आणणेस कल्पकतेने आगळे वेगळे उपक्रम सातत्याने साकारले जातात. मागील वर्षी तालुका स्तरावर समाज संगठीत व्हावा म्हणुन ९ तालुक्यांना भगवान परशुरामांच्या कायम स्वरुपी मुर्ती विनामुल्य देण्यात आल्या.

यंदा देखील वेगळे पण राखत निमंत्रण पत्रिके ऐवजी तब्बल २८ पानी मराठी नववर्ष दिनदर्शिका शास्त्र शुद्ध तिथिसह प्रकाशित करण्यात आली आहे. दिनदर्शिकेत सर्व ब्राह्मणांच्या मुळ कुळ पुरूषाची माहीती प्रकाशीत केली आहे ज्यांच्या पासुन प्रत्येक शाखेची उत्पत्ती आहे. अनेक समाजोपयोगी माहीती दिनदर्शिकेत समाविष्ट असुन समाजात आपसात संपर्क वाढुन ऐकोपा घडावे असे या मागील उद्देश असल्याचे श्रीकांत खटोड यांनी सांगीतले.

यदा भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६ च्या अंतर्गत वर्षभरात विवीध व्याख्यानाचे व स्नेह संन्मेलनाचे देखील आयोजन छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह व गंधे सभागृहात आयोजित करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष ॲड ओम त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आयोजनाचे यशस्वीते करीता सर्व पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते अतिशय उत्साहाने आणि जोमाने तयारीला लागल्याचेही सर्वांनी याठिकाणी नमूद केले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button