जळगांव जिल्हाविधानसभा निवडणूक

गुलाबराव पाटलांची वडली येथे घोड्यावरून मिरवणूक,जळके – विटनेर परिसरात जनतेचा भक्कम पाठिंबा

भजनी मंडळ व शेतकऱ्यांनी केले भव्य स्वागत

लोकमाध्यम न्युज | जळगांव ७ नोव्हेंबर २०२४ |
– जळके – विटनेर परिसरात महायुतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वात परिसरातील रस्ते, पूल, सिंचन बंधारे, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारती, जळके येथे वीज उपकेंद्राच्या क्षमतेत वाढ आणि इतर विविध विकास कामे पार पडली आहेत. ग्रामस्थांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, परिसराच्या उर्वरित विकासासाठी कटिबद्ध आहे. गावांमध्ये विविध विकास कामे केल्याने गुलाबराव पाटील यांना जळके-विटनेर परिसरात त्यांना जनतेचा भक्कम पाठिंबा लाभत आहे. विशेषतः मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत आयोध्या दर्शनावरून परतलेल्या 60 जेष्ठ भाविकांनी व भजनी मंडळानी दिंडी काढून गुलाबराव पाटील यांचे स्वागत केले आणि त्यांना आशीर्वाद दिला.

गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे जळके येथे वीज उपकेंद्राची क्षमता वाढवण्यात आली आहे. तसेच, विटनेर येथे सौर उर्जेच्या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी विशेष योजना सुरू करून ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यांनी परिसरातील शेती रस्त्यांचे खडीकरण ,डांबरीकरण करून शेतकरी वर्गाला सहज वाहतुकीची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

          वडली येथे घोड्यावरून मिरवणूक


वडली गावात महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचे घोड्यावरून भव्य मिरवणुकीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्थानिक जनतेच्या उत्साहात भरभरून सहभाग दिसला, ज्यामध्ये ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक वेशभूषेतील स्वागत सोहळा पाहायला मिळाला.

यांची होती उपस्थिती
भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, मा. जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, चंद्रशेखर पाटील, दुध संघाचे रमेशआप्पा पाटील, महिला समन्वयक शितलताई चिंचोरे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष हर्शल चौधरी, जळके, विटनेर लोणवाडी, सुभाषवाडी, पाथरी, वसंतवाडी , वराड येथील अनुक्रमे सरपंच राजू भैय्या पाटील, ललित साठे, जयश्री राठोड, अर्जुन शिरसाट, विनोद पाटील, राजाराम राठोड, आदी सरपंच तसेच साहेबराव वराडे, सचिन पाटील, डंपी सोनवणे, श्याम परदेशी, सागर परदेशी, सुरेश गोलांडे, रवी चव्हाण, संदीप सुरळकर, विकास जाधव , धोंडू जगताप, पी.के. पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, गोकुळ राठोड, सरीचंद राठोड, उखर्डू राठोड, अनिता चिमणकारे, मंगला गोपाळ, सुनील ब्राम्हणे, विजय जाधव रविंद्र पाटील, पंकज जाधव यांच्यासह महिला , महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button