जळगावविधानसभा निवडणूक

प्रती दिक्षाभूमी उभारण्यासाठी मी वचनबध्द – जयश्री महाजन

लोकमाध्यम न्युज | जळगांव १७ नोव्हेंबर २०२४ |

जळगाव (प्रतिनिधी) : शहर विकासासाठी तसेच शहराच्या सर्वांगिण प्रगतीसाठी मी कटीबध्द आहे. मात्र त्यासोबतच शहरातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शहरातर्फे मानवंदना देण्यासाठी प्रती दिक्षाभूमी उभारण्यासाठी मी वचनबध्द आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी आज (दि.१७) पत्रकारांशी बोलतांना केले.
त्या पुढे म्हणाल्या की, शहरातील पिंप्राळा भागातील घरकुलानजिकच्या दहा एकर जागेवर नागपूरच्या दिक्षा भूमीची प्रतिकृती साकरण्याचा निर्णय मी महापौर असतांना महासभा क्रमांक ५२, दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी मंजूर करुन घेतला होता. राज्य शासनाच्या मदतीने तो प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी भविष्यात मी प्रयत्नशील असेन. कारण हा प्रकल्प महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारा असेल, शिवाय यामुळे जळगावच्या पर्यटन व्यवसायातही वाढ होणार आहे.
पर्यटन व्यवसाय वाढल्यास या ठिकाणी इतर व्यवसायांसाठीही संधी निर्माण होवून, इथल्या तरुणांना रोजगार मिळण्यासह शहराची आर्थिक प्रगतीही साधेल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button