महाशिवरात्री निमित्त शिवकॉलनी येथील रुद्रेश्वर महादेव मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न.
महिला दिनानिमित्त कष्टकरी महिलांचा सत्कार व रांगोळी स्पर्धा
जळगाव दि.१० : शिवकॉलनी येथील श्री गुरुदत्त शिवकॉलनी विकास बहुउद्देशीय मंडळ यांच्या विद्यमाने आठ मार्च रोजी श्री सिद्धी गणेश व रुद्रेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त महाअभिषेक पूजा व जागतिक महिला दिनामित्तीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.महाशिवरात्रीनिमित्त श्री सिद्धी गणेश मंदिर व रुद्रेश्वर महादेव मंदिर प्राणंगात सकाळी नऊ ते चार अभिषेक पूजा ,गणपती पूजन, पुण्याहवाचन मातृका पूजन ,सर्वतोभद्र मंडल स्थापन ,नवग्रह पूजन, रुद्र देवता पूजन, रुद्रेश्वर महादेवाला रुद्र अभिषेक ,मंडळ देवता हवन पूर्णाहुती ,महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. ब्रम्हवृंदांनी पूजा विधि केले. भाविकांना दिवसभर प्रसाद म्हणून केळी, साबुदाणा खिचडी ,राजगिरा लाडू वाटप करण्यात आले.
पूजेसाठी श्री गुरुदत्त विकास बहुउद्देशीय मंडळाच्या अध्यक्ष सुलोचना बाविस्कर ,पांडुरंग बाविस्कर आणि प्रमोद शूर व रंजना शूर यांनी सापत्नी जोडीने पूजा विधी केले
प्रधान आचार्य श्रीकृष्ण जोशी गुरुजी सोबत आदित्य जोशी ,योगेश जोशी ,दिगंबर काळे गुरुजी, धनंजय जोशी, राव गुरुजी, पवन देशपांडे सचिन लोखंडे दिनेश जोशी काका गुरुजी यांनी पौरोहित्य करत पूजा विधी संपन्न झाले.
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार,रांगोळी स्पर्धा
सायंकाळी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या . त्यांचा सत्कार सुलोचना बाविस्कर, अनिता पाटील, स्मिता झाल्टे यांनी केला. या कार्यक्रमात संध्या जोशी, रिना बारेला, अरुणा देवरे या कष्टकरी महिलांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जयश्री कुलकर्णी, मनीषा पाटील, निशा भोळे, भूमिका सैंदाणे यांना रांगोळी स्पर्धाचे बक्षीस वाटप करण्यात आले. बापु पाथरवट व चुडामण पाथरवट यांनी रुद्रेश्वर महादेव मंदिर दगडात साकारले या कारागिरांचाही सन्मान करण्यात आला आहे. कार्यक्रमाला शिवकॉलनीतील सर्व भाविक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील उपस्थित सर्व महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सूत्र संचालन मनीषा शिरसाठ यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठिश्री गुरुदत्त विकास बहुउद्देशीय संचालक मंडळ ,कार्यकारी मंडळ ,महिला मंडळ समस्त शिव कॉलनी परिसर ज्येष्ठ नागरिक कॉलनीवासी आदींचे सहकार्य लाभले.