कृषीजळगांव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी मुंबईत आढावा बैठक पार

केळी पीकविमा व निर्यात सुविधा केंद्रांच्या वाढीसाठी चर्चा

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ४ नोव्हेंबर मुंबई : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि निर्यात क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज पार पडली.या बैठकीस ना .गुलाबराव पाटील, मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, जळगाव आणि ना .जयकुमार रावल, मंत्री, पणन व राजशिष्टाचार विभाग, महाराष्ट्र राज्य उपस्थित होते.

बैठकीत केळी पीकविमा मिळण्यासंबंधी प्रलंबित मुद्द्यांवर तसेच केळी निर्यात सुविधा केंद्रांची क्षमता आणि संख्या वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी अमोल हरिभाऊ जावळे, आमदार, रावेर तसेच पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जळगाव जिल्हा हा राज्यातील केळी उत्पादनात अग्रस्थानी असून, शेतकऱ्यांच्या विमा दावे निकाली काढणे, निर्यात साखळी अधिक मजबूत करणे आणि जिल्ह्याला केळी निर्यात केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर ठोस निर्णय घेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button