अधिक महिन्यानिमित्त आयोजित विष्णुसहस्र नामाची गोपाळकाला व 56 भोग ने सांगता

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : सुरभी व श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर महिला मंडळातर्फे अधिक महिन्यानिमित्त दि 17 मे पासून सुरु असलेल्या विष्णुसहस्र नामाची गोपाळ काला व ५६ भोग ने श्री सिद्धिविनायक मंदिर, रेल्वे कॉलनी येथे सांगता करण्यात आली करण्यात आली.
गोपाळकाला करिता सर्व महिलांनी वेगवेगळे खाद्य पदार्थ आणून एकत्र गोपाळकाला करण्यात आला.15 ला सोमवारी शेवटच्या दिवशी श्री विष्णूंना 56 भोग लावण्यात आले. सुरवातीला ओम नमो भगवते वासुदेवाय चे 108 वेळा नामस्मरण. नंतर विष्णुसहस्र नाम पठण , व उपस्थित सर्व महिलांचा हस्ते आरती करण्यात आली
कार्यक्रमाचे नियोजन सुरभी अध्यक्षा स्वाती कुळकर्णी, लताताई झवर, नीलिमा नाईक व स्वाती झवर ह्यांनी केले. 56 भोग सजावट सुनीता सातपुते, मंगला अमृतकर, विद्या चौधरी, राजश्री बोरोले, राखी झवर ह्यांनी केली. अश्विनी जोशी व कुंदाताई जोशी ह्यांनी गोपाळ कृष्णाचे भजन म्हटले.
ज्योती भोकरडोळे, सुनीता साळुंखे, ज्योती तलवारे, उर्मिला खडके, शैलजा नेमाडे, मंदाकिनी पाटील, चारुलता जोशी, शुभदा राव, लता सोनवणे, रंजना पांडे , सुवर्णा मते, पूनम जोशी ह्यांनी सहकार्य केले.
ह्यावेळी उषा पाटील, वृषाली सूर्यवंशी, रंजना शूर, ललिता टिपरे, रागिणी तारकस , रेवती शेंदुर्णीकर, कमलताइ बोरोले, वत्सला चौधरी, सुरडकर तसेच सुरभीच्या व रेल्वेकॉलनी परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.भजन व गरब्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अधिक महिन्यानिमित्त आयोजित विष्णुसहस्र नाम पठण कार्यक्रमात दररोज 40 ते 45 महिलांनी सहभाग घेतला.आभार स्वाती कुळकर्णी ह्यांनी मानले.





