जळगावशैक्षणिकसांस्कृतिक

संस्थापिका व प्रेरणास्त्रोत कै.डी.एस.खिमाणी यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून रोझलँडमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात

| लोकमाध्यम न्युज | जळगाव. दि. १६ : न्यू इरा एज्युकेशन सोसायटी संचलित रोझलँड इंग्लिश मिडियम हायस्कूल व रोझलँड प्राथमिक विद्यामंदिराच्या संस्थापिका कै. डी. एस. खिमाणी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करून नव्या शैक्षणिक वर्षाची मंगलमय सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. डी. एस. खिमाणी यांच्या प्रतिमेचे व प्रेरणास्थळाचे पूजन करण्यात आले. मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रेरणास्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी कै. डी. एस. खिमाणी यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करताना, “त्यांनी लावलेले शिक्षणाचे रोपटे आज विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. त्यांनी दिलेली शिस्त, संस्कार आणि शिक्षणाचा वारसा जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.

यानंतर प्री-प्रायमरी व प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, स्वागतगीत तसेच विविध उपक्रमांद्वारे उत्साहात स्वागत करण्यात आले. फुले, फुगे आणि हस्तकलेच्या आकर्षक सजावटीमुळे शाळेचा परिसर आनंदी व उत्साही वातावरणाने भारावून गेला होता. नव्या वर्गाची, नवीन मित्रांची आणि शाळेची उत्सुकता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती. नवागत विद्यार्थ्यांसाठी विशेष खाऊचेही आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी रोझलँड प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक व इंग्रजी व मराठी माध्यमांतील शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत उत्तम संस्कार आत्मसात करून सर्वांगीण प्रगती साधावी, असा संदेश यावेळी देण्यात आला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button