जळगावकृषीमहाराष्ट्र

ऑरगॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची साखळी तयार करणार – जयंत पाटील

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २९ जानेवारी २०२५ |

गावागावात ऑरगॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याची साखळी तयार करण्यात येणार आहे. त्यातुन त्यांच्या उत्पादीत शेत मालाच्या विक्रीसाठी ग्रामिण भागातील युवकांची साखळी तयार करण्यात येणार असल्याची माहिती रूरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडीयाचे जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवार, २८ जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

नागपुरच्या ऑरेंज सिटी लिसेस प्रा. लि. व रूरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडीया यांच्या सहकार्याने हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
शेतीचे शाश्वत उत्पन्न वाढवून देणारे जैविक खते आणि जैव-कीटकनाशक यांचे उत्पादन ऑरेंज सिटी लिसेस प्रा. लि.ने केले आहे. त्यास पेटंटही मिळालेले आहे. हे पेटंटेड उत्पादन शेतकर्यांच्या सेवेसाठी व सर्वांगीण विकासासाठी गावागावात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. असल्याचे रुलर चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाचे जळगाव जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यां मागे पिकाला मिळणारा कमी भाव आणि खतांच्या वाढत्या किमती आहेत. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन ऑरेंज सिटी आणि रुलर चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया ने गावापर्यंत आणि कमी खर्चात चांगली शेती चांगलं उत्पादन घेता येतील, या साठी उत्पादने विकसित केले आहेत. हे उत्पादन चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थे मार्फत चालवण्यात आलेल्या गावा गावातील घराघरात ओरगॅनीक शेती या चळवळीतून पोहचवणार आहेत. यातून उत्पादीत मालाच्या विक्रीसाठी ग्रामिण भागातील युवकांचीही एक साखळी तयार करण्यात येणार आहे. यावेळी ऑरेंज सिटी लिसेस प्रा. लि. चे डॉ. संजय देशमुख, यशपाल पुणेकर उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button