जळगांव जिल्हाशैक्षणिक

खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था संतोष मराठे यांची अध्यक्ष तर वना महाजन यांची उपाध्यक्ष पदी निवड

लोकमाध्यम न्युज जळगांव २५ : जिल्हयातील एकमेव असलेली खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव या पतसंस्थेची दि 21/05/2025 रोजी झालेल्या संचालकांच्या बैठकित अध्यक्षपदी भुसावळ येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदीर येथील संतोष मराठे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी पारोळा येथील जयहिंद प्राथमिक विद्यामंदीर चे मुख्याध्यापक वना महाजन यांची निवड करण्यात आली .

यावेळी खाजगी शाळा कर्मचारी पतसंस्था मर्या जळगाव चे माजी अध्यक्ष बोरोले सर, सलीम तडवी, गोविंदा लोखंडे, आशिष पवार, संचालक प्रशांत साखरे, स्वप्निल पाटील, राकेश पाटील, अविनाश घुगे, गणेश लोडते, अमित चौधरी, प्रफुल्ल सरोदे, धनंजय काकडे, रूपाली पाटील, तज्ञ संचालक अमोल भारंबे, निखील जोगी आदि उपस्थित होते
या निवडीबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील , उपशिक्षणाधिकारी, विजय सरोदे , नरेंद्र चौधरी तसेच खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष अजित चौधरी आणि चोपडा तालुका संघटनेचे अध्यक्ष सुनिल पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व मित्र परिवारातर्फे संतोष मराठे यांचे अभिनंदन करण्यात आले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button