जळगावसामाजिक

मेहरुण परिसरातील कंजरभाट समाजाच्या स्मशानभूमीच्या विकासाची मागणी

मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अंत्यसंस्कारात हालअपेष्टा; महापौरांना निवेदन

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) –शहरातील मेहरुण  परिसरातील मौजे गट क्रमांक ४२४ मधील कंजरभाट समाजाच्या स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था असून, या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना अंत्यसंस्कार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर समाजबांधवांनी स्मशानभूमीचे तातडीने विकसित व सुशोभीकरण करण्याची मागणी मनपा प्रशासनाकडे केली असून याबाबतचे निवेदन महापौर दीपमाला काळे यांना देण्यात आले.

समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीचा शेवटचा प्रवास सन्मानाने व्हावा, ही सर्वांचीच अपेक्षा असते. मात्र, सद्यस्थितीत या स्मशानभूमीत पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात सावलीचा अभाव, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, बसण्यासाठी व्यवस्था नसणे अशा अनेक मूलभूत समस्या आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांना अत्यंत वेदनादायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

स्मशानभूमीतून नाला वाहत असून, त्याचे बंदिस्तीकरण करून दोन्ही बाजूंनी संरक्षण भिंत उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच विसाव्यासाठी शेड, अस्थी ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष, पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल, अंतर्गत रस्ते, स्वच्छता व्यवस्था, पेव्हर ब्लॉक बसविणे आणि परिसराचे सुशोभीकरण तातडीने करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात योगेश बागडे, राहुल नेतलेकर, शशिकांत बागडे, मोहन गौरुगे, संदीप बागडे यांच्यासह समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देत, या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.निवेदन देताना अध्यक्ष योगेश बागडे, सचिव राहुल नेतलेकर,कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, वीर दहिेयेकर , मोहन गारुंगे, संदीप बागडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button