
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २० मार्च २०२५ |
२० मार्च जागतिक चिमणी दिना निमित्ताने मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात जागतिक चिमणी दिनानिमित्त ‘एक घास चिऊचा’ हा विशेष उपक्रम मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.
वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास चिमणी पाखरांच्या घटत्या संख्येस कारणीभूत ठरत आहे. चिमण्या अंगणातून गायब झाल्या आहेत. चिमण्या पुन्हा परत याव्या यासाठी जागतिक चिमणी दिनाच्या निमित्त
चिमणी पाखरांसाठी एक घास चिऊचा संकल्पना राबविणारे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, एक घास चिऊताईचा म्हणून आई आपल्या बाळाला एक घास मायेने भरवते. मात्र, चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली आहे. कुठेतरी बालपणाच्या आठवणीची चिऊताई जोडली गेलेली आहे.
चिमण्यांचा अंगणातील किलबिलाट वाढावा, त्यांचे जीवनचक्र नव्याने सुरू व्हावे, यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये मध्ये चिमणी – पक्षांबद्दल प्रेम वाढावे यासाठी पक्ष्यांसाठी घरटी तयार करून आणण्यास सांगितले . काही विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ आदींचे घरीच जलपात्र तयार करून घराच्या छतावर तर कुणी खिडकीला किंवा झाडाच्या फांदीला लटकवा व त्यामध्ये पाणी व थोडेसे अन्न टाकावे चिमण्यांचे संरक्षण ही काळाची गरज उन्हाळ्याच्या दिवसात तापमानात वाढ झाली की, तहानेने व्याकूळ झालेल्या चिमणी पाखरांची तहान – भुक भागविण्यासाठी शाळेचे विद्यार्थी हा उपक्रम राबवीत आहे.आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मीळ झाले आहे. कविता, बडबड गीते, पुस्तकांवरील चित्रे यातच चिमणी शिल्लक राहते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिमण्यांचे संरक्षण ही काळाची गरज झाली आहे.असे सांगितले यप्रसंगी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.