जळगांव जिल्हाशासकीय

जिल्हा परिषद नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी स्विकारला पदभार

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची घेतली भेट

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २० मार्च २०२५ |

( जिमाका ) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांची छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गुरुवार, दि. 20 मार्च रोजी श्रीमती करणवाल यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. डी. लोखंडे तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद याची आज जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली

पदभार स्वीकारल्यानंतर श्रीमती करनवाल यांनी तत्काळ सर्व विभाग प्रमुखांशी संवाद साधून जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती घेतली. तसेच पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली. शिक्षण, स्वच्छता, आरोग्य आणि जल जीवन मिशन यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांवर विशेष भर देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button