लोकमाध्यम न्युज | जळगांव ९ डिसेंबर २०२४
मनपा मालकीच्या मालमत्ता चोरी संदर्भात दाखल गुन्ह्याच्या सूत्रधारास अटक करावी व चोरी करणाऱ्या सर्व सदर संबंधितांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारचे निवेदन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना देण्यात आले.भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय जीएम फाउंडेशन येथून जळगाव शहर महानगरपालिकेपर्यंत निषेध व्यक्त करत घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले.
निवेदन
गेल्या आठवडाभर जळगाव मनपाच्या मालकीच्या गिरणा पंपिंग, दापोरा पंपिंग व सावखेडा शिवारातील बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाईप, लोखंडी दरवाजे व खिडक्या आदी साहित्य चोरीच्या बातम्या येत आहेत. या चोरल्या गेलेल्या मालमत्तेची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस स्टेशन व रामानंद नगर पोलीस स्टेशन अंतर्गत तीन गुन्हे दाखल असल्याचे कळते. धक्कादायक गोष्ट म्हणजे या चोरीच्या गुन्ह्यांचा मुख्य सूत्रधार व संशयित आरोपी माजी महापौर पती व माजी उपमहापौर व विरोधी पक्षनेते सुनिल सुपडू महाजन फरार असल्याचे समजते, म्हणून आम्ही या प्रवृत्तीचा निषेध करून
खालील मागण्या करतो..
१) माजी विरोधी पक्षनेते सुनिल सुपडू महाजन हे फरार असल्याने तातडीने त्यांचा शोध घेवून अटक करावी.
२) सदर गुन्ह्यांचा काटेकोर तपास करून सर्व संबंधितावर योग्य ती कारवाई करावी.
३) सदर गुन्ह्यातून अजून किती रकमेची व कोणती मालमत्ता आरोपीकडून चोरी केली गेली आहे हे जनतेसमोर आणावे.
चोरी करणाऱ्या सर्व सदर संबंधितांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारचे निवेदन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब यांना देण्यात आले असून भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय जीएम फाउंडेशन येथून जळगाव शहर महानगरपालिकेपर्यंत निषेध व्यक्त करत घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले.
तरी महोदय, सहा लाख जळगावकरांच्या हक्काच्या कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेची
जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, डॉ. राधेश्याम चौधरी, सीमा भोळे, माजी महापौर, जितेंद्र मराठे, अरविंद देशमुख, भगत बालानी, विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, मनोज काळे, गोपाल पोपटानि, सुनील सरोदे, वीरन खडके, गायत्री राणे, सुरेखा तायडे, आशिष सपकाळे, मुकुंद मेटकर, मुकुंदा सोनवणे, कैलास सोनवणे, राहुल वाघ, राजेंद्र मराठे, शंकर कुमावत, राजेंद्र घुगे पाटील, उमेश देशपांडे, मिलिंद चौधरी, विनोद मराठे, नितीन पाटील, जितेंद्र मराठे, अजित राणे, नितीन पाटील, दीपक पुंडलिक, कैलास सोमानी, अशोक घाडगे, सदाशिव ढेकळे, धीरज वर्मा, मुविकोराज कोल्हे, भूपेश कुलकर्णी, राजेंद्र मराठे, बापू कुमावत आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.