जळगांव दि.३ मे २०२४ : जळगांव येथे दि १ मे २०२४ के.बी.एस समाजमंदिर येथे समाजाच्या लग्न समारंभा ठिकाणी मतदान शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मतदानासाठी जनजागृती करणाऱ्या जळगांव जिल्हा प्रशासनाला कंजरभाट समाज युवा फाऊंडेशनचे संस्थेने सुद्धा हातभार लावला असून, आम्ही सुद्धा स्वतः लोकशाहीचा घटक आहोत, मतदान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे.मतदान हा तुमचा अधिकारच नाही तर तुमची जबाबदारी देखील आहे. असे संस्थेचे सचिव राहुल नेतलेकर यांनी सांगितले.
सदर शपथ नरेश बागडे यांनी दिली या प्रसंगी मोहन गारुंगे,राहुल नेतलेकर,नरेश बागडे,शशिकांत बागडे,सचिन बाटूंगे,योगेश बागडे,संदीप गारुंगे,प्रदीप नेतले,पंकज गागडे,निखिल गारुंगे,संदीप बागडे,संतोष रायचंदे,गौतम बागडे,क्रांती बाटूंगे,अभय गारुंगे, अविनाश अभंगे,कार्तिक बाटूंगे,जयेश माछरे,राहुल दहियेकर,गोपाल बाटूंगे,बिरजू नेतलेकर,ज्ञानेश्वर गुमाने, मनोहर अभियेकर, जळगांव,धुळे, नंदुरबार, दोंडाईचा,अमळनेर,नाशिक,संगमनेर, येथील समाजबांधवांची व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती,आदी समाजबांधव उपस्थित होते.