जळगाव दि.२७ : क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित जळगाव शहर महिला मंडळा तर्फे होळी उत्सव निमित्त आयोजित होलीका उत्सव स्नेह मिलन उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी महिलांनी पर्यावरण पूरक रंग लावून टिळा होळी साजरी केली.
होलिका उत्सवा निमीत्त घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा नयना निकम, स्नेहा कोंबडे, कुसुम बिरारी, मिना पवार, होते तर परीक्षक म्हणून उल्का पाटे, वैशाली शिरुडे यांना आमंत्रित करण्यात आले होते.प्रतिमा पूजन सह दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.गणेश वंदना अणि त्याच सोबत एका चिमुकलीच्या रामाच्या गाण्याने सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.त्यात जोडी तुझी माझी.माय लेकी स्पेशल,सोलो डान्स ,ग्रुप डान्स,गीत गायन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.
यात प्रथम,द्वितीय ,तृतीय अणि उत्तेजनार्थ या प्रमाणे सर्व विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.आलेल्या सर्व पाहुण्यांचा महिला मंडळा कडून सत्कार करण्यात आला.
जोडी तुझी माझी मध्ये प्रथम विजेती जोडी नेहा जगताप अणि जानवी जगताप.द्वितीय विजेती जोडी स्नेहा सोनवणे,आकांक्षा सोनवणे.तृतीय विजेती जोडी चेतना शिंपी,धनश्री शिंपी.उत्तेजनार्थ दीपिका शिंपी,तेजस्विनी शिंपी.सोलो डान्स प्रथम विजेती यामिनी राहुल मेटकर. द्वितीय विजेती माधुरी प्रदिप शिंपी तृतीय विजेती श्रुती शिंपी उत्तेजनार्थ तेजस्विनी शिंपी.गीत गायन प्रथम विजेते गोणाई महिला मंडळ ग्रुप.द्वितीय विजेते अनिता सोनवणे
तृतीय विजेते अनिता खैरनार उत्तेजनार्थ प्रियांका शिंपी.
ग्रुप डान्स प्रथम विजेते देवरे ग्रुप, द्वितीय विजेते.सोनवणे ग्रुप.तृतीय विजेते.मनकर्निका ग्रुप या प्रमाणे सर्व महिलांना सत्कार करून बक्षीस देण्यात आले अणि सर्व महिला क्रिकेट टीम ला जळगाव हितवर्धक संस्था अणि युवक अणि महिला मंडळ यांच्या तर्फे सन्मानचिन्ह देण्यात आले.यात जळगाव शहरातील सर्व महिला मंडळ अणि मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाच्या सर्वात शेवटी पर्यावरणपूर्वक रंग उधळून टिळा होळी साजरी करण्यात आली. शहर महिला अध्यक्ष रेखा निकुंभ यांनी कळविले आहे