जळगावक्राईम

अज्ञात व्यक्तीचा उच्छाद, कारची पुढील काच तीन महिन्यात दोन वेळा फोडली

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २२ फेब्रुवारी २०२५ |

जळगांव मधील मध्यवर्ती भागात, सेंट लॉरेन्स शाळेजवळील संचार नगर येथील सुशिक्षित लोकांच्या वस्तीमध्ये रहिवासी असलेले व बीएसएनएल मध्ये गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ हिंदी अनुवादक पदावर कार्यरत असलेल्या डॉ. परेश सननसे यांच्या मालकीची टाटा टिगॉर MH19 EA0119
क्रमांकाच्या कारची समोरची मोठी काच 14 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री परिसरातील अज्ञात व्यक्तीने लोखंडी वस्तु / दगडाच्या सहाय्याने फोडली. याच प्रकारची घटना गेल्या 2024 च्या नोव्हेंबर महिन्यात देखील घडली होती. गेल्या तीन महिन्यात एकाच कारची रु.10 हजार किमतीची पुढील काच एकाच ठिकाणी एका विशिष्ट पद्धतीने दुसऱ्यांदा फोडण्यात आल्याने परिसरात संशय व घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. सदर प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे करीत आहेत.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button