जळगाव दि. ९ : जिल्हाधिकारी कार्यालयात आज सुट्टी असताना ग्रामपंचायत विभागाच्या लिपीकांना २० हजाराची लाच घेतांना जळगाव ए.सी.बी. च्या पथकाने रंगेहाथ पकडले. महेश रमेश वानखेडे, आणि समाधान लोटन पवार , दोघे लिपीक ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव असे त्यांचे नाव व पद असुन या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार हे ग्रामपंचायत निवडणुक २०२१ मध्ये निवडुन आले होते. त्यानंतर तक्रारदार यांचे विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे रायपूर गावातील गैरअर्जदार यांनी तिन अपत्यां बाबत तक्रार अर्ज केला होता. सदरचे प्रकरण हे ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथील लिपिक महेश वानखेडे याचेकडे पेडींग होते. त्यानंतर तक्रारदार हे महेश वानखेडे यांना त्यांचे कार्यालयात भेटले असता त्याने तक्रारदार यांना सांगितले कि तुमचा ३ अपत्य बाबत चांगल्या प्रकारे अहवाल तयार करून तुम्ही अपात्र होणार नाही अशी मदत करतो
त्यासाठी मला ३००००/- रुपये द्यावे लागतील असे सांगून लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि. ०९/३/२०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली.
सदर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पंचा समक्ष पडताळणी केली असता लिपिक महेश वानखेडे यांने पंचा समक्ष लाचेची मागणी केली. त्यानंतर आज रोजी महेश वानखेडे यांनी सांगितल्याने समाधान लोटन पवार यास जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात २००००/- रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले . त्यांचेवर जिल्हापेठ पोलीस स्टेशन ता. जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपाधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, सहा.फौ दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ अमोल सुर्यवंशी, अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक सहा. फौ. सुरेश पाटील, पो.हे. रविंद्र घुगे, महिला पोलीस हे.कॉ. शैला धनगर, पो.ना. किशोर महाजन, पो. ना. सुनिल वानखेडे, पो.कॉ. प्रणेश ठाकुर, पो. कॉ राकेश दुसाने, पो. कॉ. प्रदिप पोळ. यांच्या पथकाने सापळा रचून दोघा लाचखोरांवर कारवाई केली.