जळगांव जिल्हाताज्या बातम्याशैक्षणिक

संस्थाचालक व मुख्याध्यापकांसाठी २४ एप्रिल रोजी नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चासत्राचे आयोजन

| लोकमाध्यम न्यूज जळगांव दि. २२ : शासनाच्या वतीने लवकरच नवीन शैक्षणिक धोरण राज्यातील शाळांसाठी लागू केले जाणार आहे. या शैक्षणिक धोरणाची माहिती शिक्षण क्षेत्रातील संस्था चालक व मुख्याध्यापक यांना होणेसाठी जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघ व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी व संस्थाचालकांसाठी चर्चा सत्राचे आयोजन दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता ‘डॉ. केतकी सभागृह डॉ उल्हास पाटील मेडीकल कॉलेज, जळगाव खुर्द, (भुसावळ रोड) येथे आयोजित करण्यात आले आहे.

या चर्चासत्रासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा. . अनिल झोपे, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य ए. आर. राणे, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र गणफुले हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य निळकंठराव गायकवाड भुषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील, रजिस्टार प्रमोद भिरुड, मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील उपस्थित राहाणार आहेत या चर्चासत्रासाठी जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष जयवंत पाटील, कार्याध्यक्षा रोहिणी खेवलकर-खडसे, उपाध्यक्ष व्ही.टी. जोशी, प्रा.जीवनचंद खिंवसरा, सरचिटणिस संजय सोमाणी, चिटणिस शकील पटेल, उपकार्याध्यक्ष महेंद्र मांडे तसेच मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गोपाल पाटील, सेक्रेटरी वाळासाहेब पाटील, उपाध्यक्षा साधना लोखंडे, ललित चौधरी, सहचिटणीस डी.बी., बोरसे, आर्.ए. पाटील व सर्व कार्यकारिणी सदस्य संस्थाचालक संघ व मुख्याध्यापक संघ यांनी केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button