
लोकमाध्यम न्युज जळगांव १२ : येथील हरी विठ्ठल नगरातील श्रीसंत गजानन महाराज मंदिराचा दि. १३ रोजी द्वितीय वर्धापन दिन सोहळा साजरा करीत आहे. त्या निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.त्याच सोबत दि १२ रोजी संध्या. ७ ते १० गणानाम सत्संग परिवार जळगाव तर्फे भजन संध्या चे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १३ मे रोजी सकाळी महाराजांच्या पादुकांचा अभिषेक करण्यात येईल.संध्याकाळी ५ वा श्री संतोष बारी यांच्या घरून श्रीच्या पादुकांची मिरवणूक त्यासोबत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडी मध्ये परिसरातील महिला डोक्यावर तुळसी वृंदावन,ग्रंथ,कळस घेवून सहभागी होणार आहेत.दिंडी मार्गावर रांगोळ्या आणि फुलांची सजावट करण्यात येऊन मोठ्या भक्तिमय वातावरणात पादुका व ग्रंथ दिंडी ७ वा मंदिरावर आल्या नंतर महाआरती करण्यात येईल महाआरती नंतर लगेचच महाप्रसाद वाटप करण्यात येईल. श्री गजानन महाराज मंदिर समिती तर्फे या वर्षी संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात साजऊन आकर्षक रोशनाई करण्यात येणार आहे, वर्धापन दिन सोहळा हरिविठ्ठल नगरात मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात येतो.यानिमित्ताने परिसरातील भक्तांनी महाप्रद्सादाचा लाभ घ्यावा अशी विनंती मंदिर समिती तर्फे करण्यात आलेली आहे .
मंदिर समिती तर्फे अध्यक्ष संदीप महाजन,संतोष महाजन, पंडित बारी, राहुल सोनी, पांडुरंग बारी, साहेबराव मराठे, विनोद बारी, रवींद्र बारी,धनराज बारी,गोपाल धनगर, भरत मिस्तरी,संतोष बारी,गणेश शिंदे,अर्जुन बारी,युवराज बडगुजर,मनोज गजबे,गणेश महाजन,प्रमोद बारी,भूषण भामरे,मयूर सोमानी,प्रवीण सोनवणे,कुंदन बारी परिश्रम घेत आहेत.





