लोकमाध्यम न्युज | जळगांव दि.३० जुलै २०२४ |
संत नामदेव महाराजांच्या ६७४ वा संजीवन सोहळा २ ऑगस्ट रोजी भावभक्तीने साजरा करणार समाजाध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे वारकरी वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७४ व्या संजीवन सोहळ्या चे आयोजन दिनांक २ ऑगस्ट २०२४ शुक्रवार रोजी करण्यात आले असून या संदर्भात श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेची महत्त्वपूर्ण मीटिंग नुकतीच पार पडली
गेल्या दीड महिन्यापासून कार्यकर्ते शिंपी समाजाच्या १२०० समाज बांधवांपर्यंत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन समाज बांधवांना पालखी सोहळ्याचे निमंत्रण दिले असून या साठी कार्यकर्त्यांचे टीम अहोरात्र परिश्रम घेत आहे दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजता शिंपी समाजाच्या श्रीमती मनोरुबाई जगताप सामाजिक सभागृह येथून भव्य पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सदर पालखी ही पांझरापोळ चौक मार्गे मारुती पेठ, रथ चौक सराफ बाजार, सुभाष चौक ,बेंडाळे चौक गुरुद्वारा मार्गे ,दुपारी १२ वाजता BSNL ऑफिसच्या मागे सरदार वल्लभभाई पटेल सभागृह येथे पालखीचा समारोप होईल. या ठिकाणी समाज बांधवांना महाप्रसादाचा लाभ देण्यात येईल.
जळगाव शहरातील सर्व समाज बंधू-भगिनी व युवकांनी मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन समाज अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे उपाध्यक्ष विवेक जगताप सचिव अनिल खैरनार कोषाध्यक्ष चेतन खैरनार सहसचिव दीपक जगताप प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर वसती गृह प्रमुख दिलीप सोनवणे कार्यालय प्रमुख दत्तात्रय वारुळे सदस्य मुकुंद मेटकर सुरेश सोनवणे सतीश जगताप सतीश पवार अरुण मेटकर प्रदीप शिंपी सुनील बाविस्कर गणेश सोनवणे दिलीप भांबरे बापू खैरनार महिला अध्यक्ष सौ रेखाताई निकुंभ युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी सर्व शाखाअध्यक्ष यांनी केले आहे.