जळगाव दि.२१ : चिमणी दिवसा निमीत्ता ने उन्हाळयात पक्षांना पाणी पिण्याची सोय व्हावी हया हेतुने जळगांव येथील रुख्मिणी फांऊडेशन मिडटाऊन तर्फे एस. टी. बस स्टँड परिसरात मोफत परळाचे व धान्य पुडी चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जि.पेठ पो.निरिक्षक राकेश मानगावकर, स्वरूप लुंकड, बस डेपो प्रमुख संदीप पाटील, डॉ.अमीत वर्मा, अध्यक्ष अनील चोरडीया आदी उपस्थित होते. २०० परळ व धान्य पुड्या प्रवाशांना व नागरीकांना मोफत देण्यात आली परळ साठी डॉ अमित वर्मा यांनी सहकार्य केले.
या प्रसंगी राकेश मानगावकर यांनी सांगीतले की मी सुध्दा पशु पक्षी प्रेमी आहे. उन्हाळ्यात मुक्या प्राण्यानां पाणी पिण्या साठी नागरिकांनी आपल्या घरासमोर आणि गाच्चीवर मोठे मातीचे भांडे ठेवावे.
स्वरूप लंकड यांनी नागरिकांनी दररोज पक्षांकरिता परळ मध्ये पाणी भरावे व धान्य टाकावे असे सांगीतले.
सुत्र संचलन पंकज जैन सूत्र संचालन तर आभारप्रदर्शन कल्पक साखंला यांनी केले.
यावेळी प्रवीण वाघण्णा, राजेश भंडारी, शंतनु कुडे, राहुल राका, योगेश निंबाळकर, विजय साखंला, निलेश नागला, भुषण जगताप,महाश्वेता माथुरवैश्य,व प्रवाशी उपस्थित होते.