जळगावताज्या बातम्यासांस्कृतिक

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. कल्याणी नागूलकर व सचिव पदी प्रा.क्षमा सराफ यांची निवड

युवतींच्या दहीहंडीचे यंदा १७ वे वर्ष; युवतींचा सहभाग वाढावा आणि हक्काचे व्यासपीठ मिळावे हाच उद्देश

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.८ ऑगस्ट : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 16 ऑगस्ट 2025 रोजी कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान (सागर पार्क) जळगाव येथे युवतींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. युवतींच्या दहीहंडीचे यंदा १७ वे वर्ष असून दहीहंडी सारख्या मोठ्या उत्सवात पुरूषांप्रमाणे युवतींचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही दहींहंडी सुरू करण्यात आली आहे. मानवी मनोरे बनविणे या क्रीडा प्रकाराला महाराष्ट्र शासनातर्फे साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही एकमेव युवतींची दहीहंडी साजरी होत असते.

सदर दहीहंडी उत्सवाची समिती सर्वानुमते गठीत करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी डॉ. कल्याणी नागूलकर व सचिव पदी प्रा. क्षमा सराफ यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यकारीणी पुढीलप्रमाणे

अध्यक्ष-डॉ. कल्याणी नागूलकर, उपाध्यक्ष-डॉ. अनिता पाटील, लेफ्टनंट डॉ. हेमाक्षी वानखेडे, डॉ कल्याणी मोहरील, सचिव-प्रा. क्षमा सराफ, स्वागत समिती प्रमुख-डॉ. सोनाली महाजन, लिना पवार, खजिनदार-निलम जोशी, सहसचिव-हर्षाली चौधरी, संध्या कांकरीया, प्रसिद्धी प्रमुख-यामिनी कुळकर्णी, सदस्या-चेतना नन्नवरे, प्रा. श्रीया कोगटा, क्रिस्टाबेल परेरा आदी.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button