जळगांव जिल्हावैद्यकिय

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पाहणी

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.१७ ऑगस्ट२०२५ : जळगाव- संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत केली. यावेळी खा. स्मिता वाघ, आ. अनिल भाईदास पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

पाहणीदरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी आर्किटेक्चरल मॉडेलच्या माध्यमातून मेडिकल हबची सविस्तर माहिती दिली. वैद्यकीय महाविद्यालयासाठी 5,615 चौ.मी. क्षेत्र असून त्यावर 41,622 चौ.मी. बांधकाम करण्यात आले आहे. रुग्णालयासाठी राखीव असलेल्या 5,890 चौ.मी. क्षेत्रावर देखील 41,622 चौ.मी. इतके बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच निवासस्थान व वसतीगृहांसाठी 1,14,345 चौ.मी. क्षेत्रात बांधकाम करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मेडिकल हबमधील इमारतींची पाहणी करून प्रत्यक्ष स्थितीची माहिती घेतली. या वेळी दिसून आलेल्या त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधित अभियंत्यांना देण्यात आले.

या मेडिकल हबमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संशोधन केंद्र यासह आरोग्यसेवेचे सर्व घटक एकाच ठिकाणी उभारले जाणार आहेत. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी हा या प्रकल्पामागचा उद्देश असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, हा प्रकल्प दीर्घकालीन दृष्टीकोनातून आरोग्य क्षेत्रासाठी “गेम चेंजर” ठरेल.

जळगाव जिल्ह्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असून आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे जिल्ह्याच्या प्रगतीला गती मिळणार आहे. यामुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना पुणे, मुंबईसारख्या महानगरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button