आमदार राजु मामांना आमदारकीची तिसरी टर्म आणि मंत्रीपदाची संधी
लोकमाध्यम न्युज | जळगाव २० ऑक्टोबर २०२४ |
जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांना भाजपाकडून तिसऱ्यांदाआमदारकीसाठी तिकिट मिळालेले आहे. यासोबत या विधानसभेत ते तिस-या वेळेस निवडूण आल्यावर त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपकडून आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत अनेक नव्या व जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात जळगावचे आमदार (राजु मामा) सुरेश भोळे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
जामनेर मधून ना.गिरीश महाजन, चाळीसगाव मधून मंगेश चव्हाण यांना उमदवारी जाहीर झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे ( राजू मामा) यांना भाजपकडून उमेदवारी मिळते की नाही ? यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र राजू मामांनी केलेल्या कामाची पावती म्हणून आज तिसऱ्यांदा भाजप कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.असे अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले.
रावेर मधुन नवा चेहरा
रावेरमधुन माजी दिवंगत आमदार हरीभाउ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमोल जावळे यांना उमेदवारी जाहीर करुन एक नवा चेहरा दिला आहे. अमोल जावळे हे भाजपाचे उपाध्यक्ष आहेत.
उमेदवारी अन मंत्रीपदही
आमदार सुरेश भोळे यांनी गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहराचे आमदार म्हणून काम करतानाच विकासकामांकरिता भरघोस निधी आणलेला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपात असताना सुरेश भोळे हे त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. मात्र एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ़ठी दिल्यानंतर त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. शहराच्या विकासाठी आतापर्यत त्यांनी सर्वाधिक ३०० कोटींचा निधी मिळवून दिला आहे. महापालिकेला कर्जमुक्त करतांनाच महापालिकेचे शासनदरबारी असलेले विविध प्रलंबित प्रश्न त्यांनी सोडविले आहेत. पक्षासह सामान्य जनतेशी त्यांनी जुळवून घेतल्याने त्यांना तिसऱ्या टर्मसाठी पहिल्या फेरीतच उमेदवारी जाहिर झाली.
या वेळेस ते निवडूण् आल्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तसे झाले तर एकेकाळी शिवसेनेचा (उबाठा) बालेकिल़ला असलेला जळगाव शहर मतदार संघावर भाजपाचा एक हाती हुकमी एक़का येईल. त्याजोरावर जळगाव ग्रामिणमध्येही मुसंडी मारता येईल.