मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा ; जळगाव जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने हजारो कार्यकर्ते मुंबईला जाणार

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.१ सप्टेंबर २०२५ :जळगाव जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने
दिनांक २९ ऑगस्ट पासून मुंबई येथे मराठा आरक्षणा साठी संघर्ष यौध्दा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून जी एस ग्राउंड येथून शेकडो वाहनांनी मुंबई कडे जळगाव जिल्ह्यातील मराठा बांधव कूच करतील, त्यावेळी जळगाव जिल्ह्यातून किमान ५ हजार लोकांना पाच दिवस पुरेल एव्हढी रसद ही सोबत घेवून जाणार आहे.तसेच दिनांक ३ सप्टेंबर रोजी हजारो कार्यकर्ते रेल्वेने मार्गस्थ होतील. असे जळगाव जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.
ह्या पत्रकार परिषदेला डी डी बच्छाव सर, सुरेंद्र पाटील,प्रतिभाताई शिंदे, कुलभूषण पाटील, भीमराव मराठे,राम पवार,आबा कापसे, डॉ राजेश पाटील, संतोष पाटील, सुनील गरुड, योगेश पाटील, नवनाथ दारकुंडे,राहुल पवार यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील तमाम सर्व मराठा समाजाच्या बंधू भगिनीनी दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यां जवळ आपले वाहन घेऊन यावे,आपण सर्व एकत्र पणे ३ तारखेला मुंबई कडे कूच करू असे आवाहन करण्यात आले.
कुलभूषण पाटील यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले.






