जळगांव जिल्हाआर्थिकक्राईम

तुझा जीव वाचणार नाही…! तुझा कार्यक्रमच लावून टाकतो; अधीक्षक अभियंत्याची धमकी

अजय बढे यांची पोलिस अधिक्षकांकडे संरक्षणाची ‌मागणी

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.२३ सप्टेंबर २०२५ :तापी पाटबंधारे विकास महामंडळातील भ्रष्टाचार, बनावट कागदपत्रे व कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश करणाऱ्या अजय भागवत बढे यांना थेट जिवे मारण्याची धमकी पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन यांनी दिली आहे.ही धक्कादायक घटना दिनांक २२ सप्टेंबर रोजी लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाजवळ घडली. 

तापी पाटबंधारे विभागाच्या गैरप्रकारबाबत अजय बढे यांनी केलेल्या तक्रारीवर मुख्य अभियंता यांच्या आदेशानुसार चौकशी करणारे लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता भोसले यांना तक्रारीशी संबंधित कागदपत्रे देण्यासाठी अजय बढे दुपारी १२ वाजता गेले होते.मात्र, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता भोसले‌ कार्यालयात नसल्याने बढे तेथून बाहेर पडत असताना खालच्या मजल्यावर असलेल्या जळगाव पाटबंधारे प्रकल्प कार्यालयाचे अधिक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन उभे होते.

अजय बढे यांना पाहताच महाजन यांनी “आमच्या विरोधात तक्रारी करतोस का… तुझा कार्यक्रमच लावून टाकतो, जीव वाचणार नाही तुझा” असे उघडपणे धमकाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 अजय बढे यांनी ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सुद्धा तक्रार अर्ज देवून अधिक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन व सहकारी यांच्यापासून स्वतः व कुटुंबीयांच्या जीवाला गंभीर धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्याचे आवाहन केले आहे.

जुन्या प्रकरणांचाही संदर्भ

शेततळ्याचे कामे मिळवून देतो असे अमिष देऊन सेवानिवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी.पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ श्रावण महाजन व ‌ सहकारी यांनी मिळून अजय बढे यांची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आरोपी जामीनावर आहेत.

अशाच प्रकारे बोदवड उपसा सिंचन योजनेतील वाळू तस्करी व शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक या प्रकरणातहीअजय बढे यांनी पुराव्यासह तक्रारी केल्याने अमळनेरचे प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केली आहे.

पोलिसांवर ढिलाईचा आरोप

अजय बढे यांनी याआधी १३ मार्च रोजीही संबंधितांकडून जीवाला धोका असल्याने जीवित संरक्षणासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अर्ज दिला होता. मात्र त्यावर ठोस कारवाई न झाल्याने आरोपी अधिक बळकट झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “जर माझ्या जीवाला काही अनिष्ट झाले तर त्याची जबाबदारी महाजन व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले….

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button