गुन्हेजळगांव जिल्हा

भुसावळात डबल मर्डर : पूर्व वैमनस्यातून हल्ल्याचा संशय

माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे ठार

भुसावळ दि. ३० मे २०२४ : शहरातल्या गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढत बुधवारी रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास महामार्गालगत नवीन सातारा परिसरात पुलाजवळ जळगाव नाका लगत मरिमाता मंदिरा नजिक जुन्या वैमनस्यातून वाहनात बसलेल्या माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ता सुनिल राखुंडे या दोघांवर अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळ्या झाडत त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडल्याने शहर हादरले आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असल्याचे समजते.

पुन्हा एकदा गँगवार भडकले असल्याने ही गंभीर घटना घडल्याने पोलिस खात्या समोर आव्हान उभे ठाकले आहे. पोलिस घटनास्थळी पोहचले असून त्यांना तात्काळ उपचार करण्या दृष्टीने भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. यावेळी मयतांच्या नातेवाइकांची मोठी गर्दी पहावयास मिळत होती.

वरील घटनेची माहिती समजताच सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी , अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचे सह स्थानिक पोलीस निरीक्षक घटनास्थळी रवाना झाले. शहरात या घटनेमुळे तणावाची परिस्थिती लक्षात घेवून कुठेही अनुचित घटना घडू नये या साठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीआहे.भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन    पडघन व त्यांची टीम हल्लेखोरांचा मागोवा घेवून त्यांचीमाहिती संकलित करत आहेत. हल्लेखोरांना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना रवाना करण्यातआले आहे.

या गोळीबाराच्या घटनेत मयत झालेल्या दोघांचे मृतदेह शव विश्वेदनकरण्यासाठी जळगाव येथील शासकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आले आहेत.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button