जळगांव जिल्हाविधानसभा निवडणूक

कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता निर्भय वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजवावा; जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन

लोकमाध्यम न्युज | जळगांव १९ नोव्हेंबर २०२४ |

जळगाव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून मतदान प्रक्रीया सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पुर्ण करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वासन ठेवता निर्भय वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजवावा. जिल्हा प्रशसनातर्फे सुरळीतरित्या मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आलेली असून नागरीकांनी स्वयस्फुर्तीने मतदानासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी प्रचार तोफा थंडावल्यानंतर
मतदानाच्या अंतिम तयारीत माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात
आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक
डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, उपवन संरक्षक
श्री. जमिर शेख, मनपा आयुक्त श्री. ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित
होते.

जळगांव जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी एकुण 11 विधानसभा
मतदार संघांमध्ये मतदान प्रकिया पार पडणार आहे. विधासभा निवडणूकीच्या पाश्वभुमीवर जिल्ह्यात
11 ठिकाणी स्ट्रॉग रुम व मतमोजणी केंद्र करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात एकुण 7 ठिकाणी
आंतरराज्यीय तपासणी नाके उभारण्यात आलेले आहेत. जिल्ह्याती 11 विधानसभा मतदार संघात
उभारण्यात आलेल्या विविध तपासणी नाक्यांवर व पोलिस कारवाईत 4 कोटी 74 लक्ष रुपये जप्त
करण्यात आले आहेत. पोलिस दलातर्फे 1 कोटी 92 लक्ष रुपयांची देशी अवैध दारु नष्ट करण्यात
आलेली आहे. जिल्हाभर 19 अवैध शस्त्रे, 16 काडतुस, 20 पेक्षा अधिक प्राणघातक शस्त्र
जप्त करण्यात आलेले आहे. 26 लक्ष 67 हजार 677 रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आलेली
आहे. पोलिसांनी केलेल्या आतापर्यत केलेल्या कारवाईत 6 कोटी 40 लक्ष 6599 रुपये किमतीच्या
मौल्यवान वस्तु जप्त करण्यात आलेल्या आहेत. तर 4 कोटी 74 लक्ष 97 हजार 988 रुपयांची
रोकड जप्त करण्यात आलेली आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 126 अन्वये 2921 कलम
127 अन्वये 2, कलम 128 अन्वये 55, कलम 129 अन्वये 419, कलम 163 अन्वये 3, कलम 168 अन्वये
1273, मुंबई दारु बंदी कायदा अन्वये 337, महाराष्ट्र झोपडपट्टी दादा निर्मलन कायद्यान्वये
3 जणांवर स्थानबध्दता, मुंबई पोलिस कायदा अन्वये 2 टोळ्यांची हद्दपारी कलम 56 अन्वये
14 जणांची हद्दपारी, कलम 57 अन्वये 1 गुन्हेगाराची हद्दपारी अशा कारवाया करण्यात आलेल्या
आहेत. मतदानाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात तगडा बंदोबस्त करण्यात आलेला असून एक पोलिस
अधिक्षक, 2 अप्पर पोलिस अधिक्षक, 8 उपविभागीय पोलिस अधिकारी, 33 पोलिस निरीक्षक,
149 सहाय्यक / पोलिस उपनिरिक्षक, 2569 पोलिस कर्मचारी यासोबतच अप्पर पोलिस महासंचालक
कार्यालय, राज्य गुन्हे अन्वेशन विभाग, चाललुचपत प्रतिबंध विभाग, मुंबई रेल्वे यासह
इतर विभागांकडील ३ उपविभागीय पोलिस अधिकारी, 25 सहाय्यक / उपनिरिक्षक, 1340 पोलिस कर्मचारी,
वन विभागाकडील 117 कर्मचारी, 3000 होमगार्ड, तसेच आयटीबीपी 3 कंपनी, सीआरपीएफ 4 कंपनी,
आरपीएफ 2 कंपनी,एसएसबी 1 कंपनी, मध्यप्रदेश पोलिस 3 कंपनी, एसआपीएफ 2 कंपनी असे एकुण
14 कंपन्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत. यासोबत जिल्ह्यात 122 पेट्रोलिंग
वाहने तैनात असणार आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रियेवेळी ड्रोनव्दारे नजर ठेवण्यात येणार
आहे. जळगांव शहर व ग्रामिण भागातील सर्व मतदान
केद्रांची साफसफाई पुर्ण करण्यात आलेली असून मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या मुदभूत
सुविधा देखिल मतदान केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मतदानाच्या वेळी मतदारांना
उद्भवनाऱ्या आरोग्याचे प्रश्न लक्षात घेवुन जिल्हाभरात 2735 आशावर्करच्या माध्यमातुन
आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात 3 हजार 683 मतदान केंद्राची निर्मिती
करण्यात आलेली असून मतदान कामकाज कामी 16 हजार 352 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात
आलेली आहे. जिल्हाभरातील 16 मतदान केंद्रावर मोबाईल नेटकर्व नसल्यामुळे त्याठिकाणी
पर्यायी व्यवस्था उपलबध करुन देण्यात आलेली आहे. जिलहाभरात 2962 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग
होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यत 1853 मतदारांनी गृह मतदानाचा फायदा घेतलेला आहे.

सोशल
मिडिया तसेच प्रसार माध्यमांवरुन प्रकाशित होणाऱ्या मजकुराच्या प्रमाणिकरणासाठी स्थापन
करण्यात आलेल्या माध्यम प्रमाणिकीकरण व सनियंत्रण समिती मार्फत एकूण 109अर्जाव्दारे
जवळपास 336 जाहिराती प्रमाणित करुन त्यांना प्रसारित करण्यासाठी परवानगी देण्यात आली
आहे व माध्यम प्रमाणिकीकरण व सनियंत्रण समिती मार्फत प्रमाणित न करता परस्पर सोशल मिडियावरील
विविध माध्यमांव्दारे राजकीय व इतर मंजूकर प्रसारित केल्याप्रकरणी जिल्हयातील ११ विधानसभा
मतदार संघातील १२ उमेदवारांना माध्यम प्रमाणिकीकरण
व सनियंत्रण समिती मार्फत कारणे दाखवा नोटीसा
बजावण्यात आल्या, त्यांचे खुलासे घेवून खर्च त्यांच्या उमेदवारी खर्चात दाखविण्याचे
काम सुरु आहे.

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button