जळगांव जिल्हासामाजिक

दिवाळीचा सण सुरक्षित आणि आनंदात साजरा करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाचे जाहीर आवाहन

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. १८ ऑक्टोंबर २०२५ : जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी यंदा दिवाळी साजरी करा सुरक्षितपणे आणि आनंदाने अशा शुभेच्छा देतांनाच जळगाव जिल्हा पोलिसांतर्फे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

दिवाळीचा सण सुरक्षित आणि आनंदात साजरा करण्यासाठी कृपया खालील सूचनांचे पालन करा:

फटाक्यांबाबतची खबरदारी:

*फटाके फक्त परवानाधारक विक्रेत्यांकडून घ्या.

*मोकळ्या आणि सुरक्षित ठिकाणीच फोडा.

*लहान मुलांना तुमच्या देखरेखीखाली फटाके फोडू द्या.

*फटाके फोडताना सुती कपडे घाला.

*शांतता क्षेत्रात (रुग्णालय, शाळा) फटाके फोडू नका.

चोरी, सोनसाखळी हिसकावणे व घरफोडी टाळण्यासाठी खबरदारी:

*बाहेरगावी जात असाल तर शेजाऱ्यांना व जवळच्या पोलीस स्टेशनला नक्की कळवा.

*बाजारपेठेत व गर्दीच्या ठिकाणी आपले पाकीट, मोबाईल आणि मौल्यवान वस्तू सांभाळा. अनोळखी व्यक्तींपासून सावध रहा.

*महिलांनी मौल्यवान दागिने घालून एकट्याने फिरणे टाळावे. दागिने दिसणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

*संशयास्पद दुचाकीस्वारांपासून सावध रहा, विशेषतः जे आपला चेहरा लपवतात किंवा ज्यांच्या गाडीला नंबर प्लेट नाही.

*घर सोडताना दरवाजे-खिडक्या व्यवस्थित बंद करा. घराला मजबूत व अतिरिक्त कुलूप लावा.

*अनोळखी फेरीवाले किंवा मदतनीस यांची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय घरात प्रवेश देऊ नका.

* शक्य असल्यास आपल्या घराच्या परिसरात CCTV कॅमेरे लावा व ते चालू असल्याची खात्री करा.

ऑनलाइन फसवणूक टाळा:

* ‘मोफत बक्षीस’ किंवा ‘मोठ्या सवलती’च्या बनावट लिंक्सवर क्लिक करू नका.

* आपला बँक OTP, CVV किंवा पिन कुणालाही शेअर करू नका.

 वाहतुकीचे नियम पाळा:

*आपले वाहन फक्त पार्किंगच्या ठिकाणीच लावा.

*मद्यपान करून गाडी चालवू नका.

महत्त्वाचे संपर्क क्रमांक:

*पोलीस नियंत्रण कक्ष: 112*

*अग्निशमन दल: 101*

*रुग्णवाहिका: 108*

जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छादेतांनाच दिवाळीचा सण सुरक्षित आणि आनंदात साजरा करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे असे जाहीर आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button