जळगावराजधानी दिल्ली

भीषण स्फोटाने राजधानी दिल्ली हादरली; 10 ठार , दिल्ली-मुंबईत हाय अलर्ट !

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. १० नोव्हेंबर नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्ली हादरवणाऱ्या भीषण स्फोटाची घटना आज संध्याकाळी सुमारे सात वाजता लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळील पार्किंग परिसरात घडली. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटानंतर दिल्ली, मुंबई तसेच देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारचा अचानक स्फोट झाला आणि काही क्षणांतच गाडी आगीत वेढली गेली. आगीचा भडका एवढा तीव्र होता की शेजारी उभ्या असलेल्या तीन कारही जळून खाक झाल्या. सुरुवातीला हा गॅस सिलिंडर स्फोट असल्याची चर्चा होती, परंतु स्फोटाचा आवाज, ज्वाळांची तीव्रता आणि स्फोटानंतर झालेली हानी पाहता हा गंभीर स्वरूपाचा स्फोट असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून, कारमधून बाहेर काढलेल्या अनेक जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत दहा मृतदेह सापडले असून, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

या घटनेनंतर एनएसजी आणि फॉरेन्सिक विभागाच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब गोळा केले जात आहेत.

दिल्ली पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. स्फोटानंतर संपूर्ण दिल्ली आणि मुंबईत सुरक्षा अलर्ट वाढविण्यात आला असून रेल्वे स्थानके, विमानतळ, तसेच गर्दीच्या भागांमध्ये सतर्कता वाढवली गेली आहे.

या घटनेने दिल्लीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्फोटाचे नेमके कारण आणि त्यामागील स्वरूप तपासानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button