जळगावधार्मिकसामाजिक

श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सव – 2026 च्या अध्यक्षपदी सिद्धार्थ बाफना यांची निवड

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. १६ नोव्हेंबर : सकल जैन| संघाच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी भव्य तीर्थंकर प्रभू वमहावीर जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या उपस्थितीत अशोकभाऊ जैन, नयनताराजी बाफना, .प्रदीपभाऊ रायसोनी, सुशीलजी बाफना, .मनिषदादा जैन,  कस्तुरचंदजी बाफना, ललितभाई लोढाया, .आशिष जैन, नवरातमल चोरडिया, विजयराज कोटे, कोठारी, भंवरलाल संघवी, सुदीप मुथा, व इतर मान्यवर समाजबांधव उपस्थित होते, राजकुमार सेठिया यांनी 2025 महोत्सवाचे प्रास्ताविक करून सर्व मंडळांचे व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

त्यानंतर, महेंद्र जैन यांनी संस्थेच्या अहवालाचे वाचन केले. अनिल कोठारी यांनी सूत्र संचालन तर स्वरूप लुंकड यांनी आभार मानले.

या बैठकीत, सिद्धार्थजी रतनलालजी बाफना यांची तीर्थंकर प्रभु महावीर जन्मकल्याणक महोत्सव – २०२६ साठी महोत्सव समिती अध्यक्ष म्हणून एकमताने घोषणा करण्यात आली. उपस्थित सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला संपूर्ण संघातील बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button