जळगाव दि . १७ : श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित युवक मंडळातर्फे नुकत्याच ७ ते १० मार्च दरम्यान मानराज पार्क येथे शिंपी प्रीमियर लीग सीजन 3 चे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दोन वर्षांपासून फायनल पर्यंत पोहचून मॅच गमविनारा शिंपी डायनामाइट्स हा संघ ह्या वेळेस विजयी ठरला असून त्याचे संघमालक संदीप सोनवणे तर विजयी संघाचे कर्णधार विजय (विकी) जगताप हे असून चार दिवसांच्या या रोमांचित स्पर्धेत एकूण १४ संघांनी सहभाग घेतला. त्यात जळगाव जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरून खेळाडूंचा सहभाग होता. विषेशत: यात समाजाच्या ६ महिलां संघांनी सुद्धा या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये शिंपी स्ट्रायकर हा संघ विजयी झाला असून त्यांचे संघ मालक मीनाक्षी शिंपी तसेच कर्णधार रत्ना अशोक जगताप ह्या आहेत.
खेळांच्या माध्यमातून समाज संघटन व भावी क्रिकेट खेळाडू तयार होणार : आ .राजू मामा भोळे
चार दिवसांच्या शिंपी प्रीमियर लीग स्पर्धेसाठीआयोजकांनी खरोखरच भरपूर परिश्रम घेतले असून क्रिकेट खेळाच्या माध्यमातून समाज संघटन व भावी क्रिकेट प्लेयर आपल्या समाजातून तयार होतील असे आ.राजु मामा भोळे यांनी या प्रसंगी सांगितले.स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजना बद्दल युवक मंडळाचे त्यांनी कौतुक केले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष- राजेंद्रकुमार सोनवणे, संस्था उपाध्यक्ष विवेक जगताप, प्रमुख अतिथी जिल्हाध्यक्ष बंडू नाना शिंपी, विश्वस्त पी. टी. शिंपी, सुप्रीम जनरल मॅनेजर रविकिरण कोंबडे,अ. भा. युवक अध्यक्ष रूपेश बागुल, मुख्य प्रायोजक प्रमोद शिंपी, जिल्हा युवक अध्यक्ष तुषार शिंपी, माजी नगरसेवक आबा कापसे, अनिल खैरनार, प्रदीप शिंपी, मनोज भंडारकर, सुरेश सोनवणे, गणेश सोनवणे, शहर युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी हे होते.
स्पर्धा कार्यक्रम यशस्वीते साठी शिंपी प्रीमियर लीग प्रमुख सुमित अहिरराव, युवक सचिव हेमंत शिंपी, सागर (चार्ली) शिंपी, विशाल देवरे, यशवंत शिंपी, निलेश चव्हाण,योगेश शिंपी, धर्मेंद्र जगताप, अँड.भूषण शिंपी.यांनी परिश्रम घेतले.
सर्व उत्कृष्ट खेळाडूंना तसेच विजयी टीमला आयोजकांकडून सन्मान चिन्ह तसेच ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक येथील सचिन जाधव यांनी केले.विजेत्या शिंपी डायनामाइट्स टीम चे ,संघमालक, संदीप सोनवणे,कर्णधार वजय (विक्की) जगताप ,उल्हास देवरे ,सुमित अहिरराव ,केतन अहिरराव ,सुमित सोनवणे ,मॉन्टी सोनवणे ,निलेश सोनवणे ,हर्षल शिंपी ,पवन सोनवणे ,किरण सोनवणे ,प्रल्हाद शिंपी , डीजे गौरव ,योगेश शिंपी ,सुरज जाधव विजयी ट्रॉफी स्विकारल्या नंतर विजेत्या संघातील खेळाडूंनी कर्णधार विकी जगताप यास खांद्यावर उचलून मैदानात जल्लोष केला.महिलांमध्ये विजेत्या शिंपी स्ट्रायकर टीम च्या संघमालक
मीनाक्षी शिंपी, कर्णधार रत्ना अशोक जगताप,श्रुती शिंपी,दिपाली गांगुर्डे,चेतना शिंपी,अपेक्षा अहिरराव,मनिषा सोनवणे, ऋतुजा ब्राह्मणकर,प्रियांका शिंपी,मनीषा सोनवणे यांनीही विजयाचा जोरदार जल्लोष केला.