जळगाव मनपा निवडणूक रणधुमाळी: शिवसेनेचे गौरव सोनवणे यांची ‘प्रभाग १८ अ’ मधून बिनविरोध निवड

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. १ जानेवारी २०२६ : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत बिनविरोध निवडींची मालिका कायम असून, प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ (अनुसूचित जमाती राखीव) मधून शिवसेनेचे उमेदवार डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांच्यानंतर आता शिवसेनेनेही मतदानापूर्वीच आपले खाते उघडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
प्रभाग १८ ‘अ’ मधील निवडणूक प्रक्रियेत शिवसेनेच्या डॉ. गौरव सोनवणे यांच्या विरोधात मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत मयूर सोनवणे यांनी आपली माघार घेतल्याने डॉ. गौरव सोनवणे यांच्या निवडीचा मार्ग सुकर झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करताच शिवसेना कार्यकर्त्यांनी महानगरपालिका परिसरात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.
डॉ. गौरव सोनवणे हे चोपडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र आहेत. पेशाने डॉक्टर असलेल्या गौरव यांची सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातील कामामुळे प्रभागात मोठी ओळख आहे







