जळगावमहापालिका निवडणुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रोड शो दरम्यान जळगावात चौका–चौकात जल्लोषात स्वागत

महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या ७५ उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो; फटाके, घोषणांनी शहर दणाणले

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. ६ जानेवारी २०२६ : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या ७५ उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज, दुपारी साडेचारच्या सुमारास, शहरात भव्य ‘महाविजय रथयात्रा’ काढण्यात आली. शिवाजी पुतळ्यापासून सुरू झालेल्या या रथयात्रेला शहरातील विविध चौका–चौकांत नागरिकांनी उस्फूर्त गर्दी करत जल्लोषात स्वागत केले.

या महाविजय रथयात्रेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रोड शोदरम्यान महायुतीचे ७५ उमेदवार रथयात्रेत सहभागी झाले असून, विविध घोषणांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

घोषणाबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांची ही महाविजय रथयात्रा शिवाजी पुतळ्यापासून नेहरू चौक, लालबहादूर शास्त्री टॉवर, चित्रा चौक, गोलाणी मार्केट मार्गे पुन्हा शिवाजी पुतळा येथे जल्लोषात समारोप करण्यात आला. रथयात्रेदरम्यान परिसरात प्रचंड गर्दीचे स्वरूप पाहायला मिळाले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जळगाव पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button