जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का, जिल्हाप्रमुख राजीनामा देत शिंदे सेनेत करणार प्रवेश
लोकमाध्यम न्युज | जळगांव १९ नोव्हेंबर २०२४ |
जळगाव । शहर विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदानाच्या अवघ्या एक दिवस अगोदर शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकीने राजीनामा दिला आहे. दरम्यान, भंगाळे हे शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात प्रवेश करणार आहेत. आज घडलेल्या या नाट्यमय घडामोडीने शिवसेना (उबाठा) गटाला मोठा धक्का बसला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका उद्या दि.२० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. राज्यातील निवडणुकांच्या अनुषंगाने यंदा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आ.सुरेश भोळे हे तिसऱ्यांदा उमेदवारी लढवत आहेत तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी महापौर जयश्री सुनील महाजन या निवडणूक लढवत आहेत.
जळगाव जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे हे राजीनामा देण्याच्या तयारीत असून त्यांनी देखील वृत्ताला दुजोरा दिला आहे.
विष्णू भंगाळे हे शिवसेनेत प्रवेश करणार असून शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्याचे समजते. निवडणुकीच्या एक दिवस अगोदर विष्णू भंगाळे यांचा पक्ष बदल महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपाचे उमेदवार सुरेश भोळे हे विष्णू भंगाळे यांचे काका भागवत भंगाळे यांचे शालक असून ह्या नात्याने विष्णू भंगाळे राजु मामांचे भाचेआहेत .